राज ठाकरे News

महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय पुढारी आहेत. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे (Uddhav Thackeray) चुलत भाऊ आहेत. राज ठाकरे यांचा जन्म १४ जून १९६८ रोजी मुंबईत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीकांत ठाकरे आणि आईचे नाव कुंदा ठाकरे आहे. त्यांना २ मुले आहेत आणि त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे या मराठी चित्रपटसृष्टीतील छायाचित्रकार, निर्माता-दिग्दर्शक मोहन वाघ यांच्या कन्या आहेत. राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे हेदेखील आता राजकारणात सक्रिय झाले आहेत.


शिवसेनेत असताना भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आणि जाहिर सभांमधून राज ठाकरेंनी आपल्या वक्तृत्व आणि नेतृत्व गुणांची चुणूक दाखवली. शिवसेनेत मतभेद झाल्यानंतर त्यांनी ९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पक्षाची स्थापना केली. मनसेची स्थापना होताच, परप्रांतियांचे राज्यात येणारे लोंढे, भूमिपुत्रांचे हक्क, मराठी भाषेला प्राधान्य, रेल्वेमध्ये होणारी उत्तर भारतीयांची नोकरभरती, मुंबईच्या समुद्रकिनारी होणारी छठपुजा या मुद्द्यांवरून जोरदार रणशिंग फुंकले.

मनसेने टोल विरोधात छेडलेले आंदोलनही लक्षवेधी ठरले. तसेच मशिदीवरील लाऊडस्पीकर आणि मुंबईत दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी मनसेने आक्रमक आंदोलन केले. राज ठाकरेंच्या आक्रमक आणि स्थानिक मुद्द्यांच्या राजकारणामुळे २००९ साली विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार निवडून आले होते. मात्र त्यानंतर पक्षाला गळती लागत २०१४ आणि २०१९ साली राज ठाकरेंना केवळ एक आमदार निवडून आणता आला.


राज ठाकरेंनी वेळोवळी घेतलेल्या राजकीय भूमिका अनेकदा वादात अडकल्या आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देत मनसेचे उमेदवार उभे केले, मात्र त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. २०१९ साली लोकसभा निवडणुकीदरम्यान ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत भाजपाच्या विरोधात त्यांनी जोरदार प्रचार केला. तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अधिकृतरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देत महायुतीचा घटक होणे पसंत केले. तसेच महाविकास आघाडीच्या विरोधात महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभाही घेतल्या.


Read More
Uddhav and Raj Thackeray sister kirti phatak
“आज बाळासाहेब असते तर…”, राज ठाकरे – उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर आतेबहि‍ण किर्ती फाटक काय म्हणाल्या?

Raj Thackeray and Uddhav Thackeray Reunite: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेबाबत त्यांची आतेबहीण किर्ती फाटक यांनी प्रतिक्रिया…

What Raj Thackeray said?
Raj Thackeray : काश्मीरच्या दहशतवादी हल्ल्यावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया, “हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्या…”

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दहशतवादी हल्ल्याबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Uddhav and Raj Thackeray come together Thackeray government in next five years
उध्दव व राज ठाकरे एकत्र आले तर राज्यात पुढील पाच वर्षांत “ठाकरे सरकार’ येणार , उबाठा आमदार महेश सावंत

उद्धव व राज ठाकरे एकत्र येणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे मराठी माणसाला न्याय हक्क मिळेल. – आमदार महेश सावंत

Raj Thackeray Uddhav Thackeray
“शाळकरी मुलांसारख्या अटी पाहून…”, राज-उद्धव युतीबाबत शिंदे गटाचं वक्तव्य; म्हणाले, “राज ठाकरे झुकणार नाहीत”

Uday Samant : उद्धव ठाकरे यांनी युतीसाठी राज ठाकरेंसमोर अटी ठेवल्याचा दावा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत…

Maharashtra development questions to eknath shinde
राज-उध्दव युतीच्या प्रश्नावर चिडलेल्या एकनाथ शिंदे यांना राजू पाटील यांनी पाठविले विकासाचे १३ प्रश्न

श्रीकांत शिंदे यांना डिवचण्याची एकही संधी न सोडणाऱ्या माजी आमदार राजू पाटील यांनी गेल्याच आठवड्यात शिंदे यांना डिवचले होते.

Sharad Pawar reaction on Raj Thackeray and Uddhav Thackeray reunion
Sharad Pawar: राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; पवार कुटुंबाबाबतही केले भाष्य

Sharad Pawar on Raj-Uddhav Thackeray Reunion: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवर आता शरद…

Sanjay Raut on Raj and uddhav
Sanjay Raut : “आपण इथंच थांबायला हवं!” ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेला जोर आलेला असताना संजय राऊत असं का म्हणाले?

Sanjay Raut : मनसेप्रमुख मुंबईत आल्यानंतर राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत चर्चा होणार असल्याचं मनसे नेत्यांनी सांगितलंय. मात्र, संजय…

Raj Thackeray Uddhav Thackeray alliance news in marathi
Maharashtra News Highlights: ‘उशिरा का होईना पण शहाणपण आलं’, हिंदी भाषेची सक्ती मागे घेतल्यानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

Marathi Pune Crime News Highlights : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.

ताज्या बातम्या