राज ठाकरे Videos

महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय पुढारी आहेत. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे (Uddhav Thackeray) चुलत भाऊ आहेत. राज ठाकरे यांचा जन्म १४ जून १९६८ रोजी मुंबईत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीकांत ठाकरे आणि आईचे नाव कुंदा ठाकरे आहे. त्यांना २ मुले आहेत आणि त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे या मराठी चित्रपटसृष्टीतील छायाचित्रकार, निर्माता-दिग्दर्शक मोहन वाघ यांच्या कन्या आहेत. राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे हेदेखील आता राजकारणात सक्रिय झाले आहेत.


शिवसेनेत असताना भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आणि जाहिर सभांमधून राज ठाकरेंनी आपल्या वक्तृत्व आणि नेतृत्व गुणांची चुणूक दाखवली. शिवसेनेत मतभेद झाल्यानंतर त्यांनी ९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पक्षाची स्थापना केली. मनसेची स्थापना होताच, परप्रांतियांचे राज्यात येणारे लोंढे, भूमिपुत्रांचे हक्क, मराठी भाषेला प्राधान्य, रेल्वेमध्ये होणारी उत्तर भारतीयांची नोकरभरती, मुंबईच्या समुद्रकिनारी होणारी छठपुजा या मुद्द्यांवरून जोरदार रणशिंग फुंकले.

मनसेने टोल विरोधात छेडलेले आंदोलनही लक्षवेधी ठरले. तसेच मशिदीवरील लाऊडस्पीकर आणि मुंबईत दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी मनसेने आक्रमक आंदोलन केले. राज ठाकरेंच्या आक्रमक आणि स्थानिक मुद्द्यांच्या राजकारणामुळे २००९ साली विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार निवडून आले होते. मात्र त्यानंतर पक्षाला गळती लागत २०१४ आणि २०१९ साली राज ठाकरेंना केवळ एक आमदार निवडून आणता आला.


राज ठाकरेंनी वेळोवळी घेतलेल्या राजकीय भूमिका अनेकदा वादात अडकल्या आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देत मनसेचे उमेदवार उभे केले, मात्र त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. २०१९ साली लोकसभा निवडणुकीदरम्यान ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत भाजपाच्या विरोधात त्यांनी जोरदार प्रचार केला. तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अधिकृतरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देत महायुतीचा घटक होणे पसंत केले. तसेच महाविकास आघाडीच्या विरोधात महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभाही घेतल्या.


Read More
What did Raj Thackeray and Uddhav Thackerays sisters say about the discussion of an alliance between MNS and Thackeray group
मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची चर्चा; राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या बहीण काय म्हणाल्या?

Raj Thackeray And Uddhav Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्यातील दोन प्रमुख नेते एकत्र…

Sanjay Raut on MNS and Uddhav Thackeray: "हा विषय जिवंतच राहणार" - संजय राऊत
Sanjay Raut on MNS and Uddhav Thackeray: “हा विषय जिवंतच राहणार” – संजय राऊत

शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेच्या युतीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कुटुंबासह परदेशात आहेत.…

Girish kuber exclusive what are the chances of raj thackeray and uddhav thackeray coming together for alliance
Girish Kuber: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता किती?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे हे एकत्र येणार, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगली…

Sandeep Deshpande wrote a letter to Mohan Bhagwat
Sandeep Deshpande: संदीप देशपांडेंचं मोहन भागवतांना पत्र,पत्रात नेमकं काय लिहिलंय?

Sandeep Deshpande: MNS इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाला मनसेने आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने विरोध दर्शवला आहे. अशातच आता…

mns leader sandeep deshpande reaction on mns and shivsena thackeray group alliance controversy
Sandeep Deshpande on Uddhav Thackeray: “२०१७मध्ये बाळा नांदगावर मातोश्रीवर गेले होते”

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेनं सध्या जोर धरला आहे. असं असतानाच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी…

Sanjay Raut on Alliance with MNS: "यात चुकीचं काय?" युतीसंदर्भात संजय राऊतांची प्रतिक्रिया
Sanjay Raut on Alliance with MNS: “यात चुकीचं काय?” युतीसंदर्भात संजय राऊतांची प्रतिक्रिया

दोन ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पण या युतीसाठी उद्धव ठाकरेंनी अट टाकली असल्याचं बोललं…

Minister Uday Samant Reaction on Raj thackeray and Uddhav Thackeray together
Uday Samant on Raj Thackeray: ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा, उदय सामंत यांचा उद्धव ठाकरेंना टोला

“मनसे हा राज ठाकरे यांच्या नेतृत्वात चालणारा पक्ष आहे. त्यांनी कोणाला हात पुढे करावा, कोणाशी युती करावी हा त्यांच्या पक्षाचा…

ncp sharad pawar group mp reaction on mns and shivsena thackeray group alliance
Supriya Sule: “आमच्या कुटुंबासाठी आणि…”; सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

Supriya Sule:ठाकरे बंधुंच्या युतीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. अशताच आता या चर्चांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली…

ताज्या बातम्या