राजस्थान निवडणूक २०२३ News

सध्या राजस्थानमध्ये ५.२ कोटी लोकांकडे मतदान करण्याचा अधिकार आहे. राजस्थान विधानसभेच्या (Rajasthan Election 2023) २०० जागांसाठी २३ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे. राज्यातील एकूण २०० विधानसभा जागांपैकी ३४ जागा या अनुसूचित जागींच्या उमेदवारांसाठी तर २५ जागा या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.


२०१८ रोजी झालेल्या विधानसभेची मुदत १४ जानेवारी २०२४ रोजी संपणार असल्याने त्याआधीच मतदान प्रक्रिया पूर्ण करण्याचा निवडणूक आयोगाचा मानस आहे. २३ नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर लगेच ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल (Rajasthan Assembly Election 2023 Result) समोर येणार आहेत. राजस्थानमध्ये सत्ता टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात कॉंग्रेस आहे. तर भाजपा तेथील खासदांना उमेदवारी देत आपल्याकडे वळवत असल्याचेही म्हटले जात आहे. या प्रयत्नामध्ये अनेक नेत्यांनी खासदारकीचे तिकीट गमावल्याने पक्षात सध्या अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळते.


२०१८ च्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेसने २०० जागांपैकी १०० जागांवर वर्चस्व मिळवले होते. तर भाजपाला ७३ जागांवर समाधान मानावे लागले होते. तेव्हा बहुमतापेक्षा फक्त १ जागा कमी असल्याने कॉंग्रेसने राजस्थानमध्ये बहुजन समाज पक्षाच्या मदतीने सरकार स्थापन केले होते.


Read More
Rajasthan By-Election Independent candidate assault SDM
Rajasthan By-Election : अपक्ष उमेदवाराची अधिकाऱ्याला मारहाण; कार्यकर्त्यांकडून पोलिसांवर दगडफेक, वाहनं पेटवली, जिल्ह्यात तणाव

Rajasthan By-Election Updates : हिंसक आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांकडून अश्रू धुराचा मारा

rajasthan minister stage collapsed video
Video: …आणि बघता बघता स्टेज कोसळलं, मंत्रीही खाली पडले; सोशल मीडियावर Video व्हायरल!

मंत्री हीरालाल नागर स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या स्टेजवर चढल्यानंतर हे स्टेज कोसळलं. या प्रकाराचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

pm narendra modi called chief minister video
“मुख्यमंत्री नरेंद्र मोदीजी”, राजस्थानच्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यात सूत्रसंचालकांनी केला उल्लेख; Video व्हायरल!

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या शपथविधी सोहळ्याच्या वेळी घडलेल्या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!

Bhajan Lal Sharma New CM of Rajasthan Marathi News
Rajasthan New CM : एकेकाळी सरपंचपदाची निवडणूक हरले, आज थेट मुख्यमंत्री; कोण आहेत भजनलाल शर्मा?

Bhajan Lal Sharma New CM of Rajasthan : भाजपाने पहिल्यांदाच निवडून आलेल्या भजनलाल शर्मा यांना राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून घोषित केले…

Bhajanlal Sharma new cm
Rajasthan New CM : भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री; छत्तीसगड, मध्य प्रदेश प्रमाणेच भाजपाचे धक्कातंत्र

Bhajan Lal Sharma New CM of Rajasthan : भाजपाने प्रस्थापित नेतृत्वाला बाजूला सारत राजस्थानमध्ये भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्रीपदी निवडले आहे.

Balaknath Adityanath
राजस्थानला ‘योगी’ मिळणार नाहीत? मुख्यमंत्रिपदाबाबत बालकनाथ यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, “मला पंतप्रधानांच्या…”

भाजपाने गोरखपूर मठाचे महंत योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद दिलं आहे. त्याचप्रमाणे मस्तनाथ मठाचे महंत बालकनाथ यांना राजस्थानचं मुख्यमंत्रिपद…

VASUNDHARA RAJE
निवडणूक झाली, राजस्थानमध्ये आता ‘रिसॉर्ट राजकारण’; आमदाराच्या वडिलांच्या आरोपानंतर वसुंधरा राजेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या मार्गात अडथळा?

दुष्यंत सिंह ४ डिसेंबर रोजी माझ्या मुलाला भेटायला आले होते. ही भेट झाल्यानंतर माझ्या मुलाला त्यांनी जयपूरच्या बाहेर असलेल्या एका…

Narendra Modi Amity Shah
भाजपाने विधानसभेच्या रिंगणात उतरवलेल्या २१ खासदारांपैकी कितीजण जिंकले, पराभूत झालेल्यांचं पुढे काय होणार? प्रीमियम स्टोरी

भाजपाने राजस्थान आणि मध्य प्रदेशात प्रत्येकी सात, छत्तीसगडमध्ये चार आणि तेलंगणातल्या ३ खासदारांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं होतं.

sachin pilot
राजस्थानच्या पराभवावर सचिन पायलट यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; “आम्ही प्रामाणिकपणे…” प्रीमियम स्टोरी

राज्यातील सत्तांतराची परंपरा मोडीत काढण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने प्रयत्न केला. मात्र, आम्हाला त्यात यश आले नाही, असे सचिन पायलट म्हणाले.