राजकुमार राव Photos
हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता राजकुमार राव २०१० मध्ये ‘लव्ह सेक्स और धोका’ या चित्रपटातून पदार्पण केलं. सुरुवातीला थोडे वेगळ्या धाटणीचे चित्रपट करणाऱ्या राजकुमारला आता मोठमोठ्या बॅनरचे चित्रपट मिळतात. दिग्दर्शक हंसल मेहता यांच्याबरोबर राजकुमारची जोडी चांगलीच जमली. त्यांच्याबरोबर त्याने उत्कृष्ट चित्रपट दिले. राजकुमारचे ‘न्यूटन’ आणि ‘बरेली की बर्फी’ हे चित्रपट चांगलेच गाजले. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘बधाई दो’ या चित्रपटातील त्याच्या कामाची खूप प्रशंसा झाली.