
राजनाथ सिंह हे भारतीय राजकारणी असून ते भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहे. तसेच ते देशाचे संरक्षणमंत्री देखील आहेत. राजनाथ सिंह यांचा जन्म १० जुलै १९५१ रोजी उत्तर प्रदेशातील भभौरा येथे झाला. त्यांनी भौतिकशास्त्रात पदव्यूत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. राजनाथ सिंह यांनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून केली होती. ते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षदेखील राहिलेले आहेत.