राजनाथ सिंह News

rajnath singh (1)

राजनाथ सिंह हे भारतीय राजकारणी असून ते भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहे. तसेच ते देशाचे संरक्षणमंत्री देखील आहेत. राजनाथ सिंह यांचा जन्म १० जुलै १९५१ रोजी उत्तर प्रदेशातील भभौरा येथे झाला. त्यांनी भौतिकशास्त्रात पदव्यूत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. राजनाथ सिंह यांनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून केली होती. ते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षदेखील राहिलेले आहेत.


राजनाथ सिंह हे १९८८ मध्ये पहिल्यांदा उत्तरप्रदेश विधान परिषदेवर निवडून आले होते. तसेच १९९१ मध्ये उत्तर प्रदेशचे शिक्षणमंत्री झाले. मार्च १९९७ मध्ये ते उत्तरप्रदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्षही झाले. तर ऑक्टोबर २००० साली ते उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. १९९९ साली अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रिपदाची जबाबदारी पार पडली. २००३ साली राजनाथ सिंह अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कृषीमंत्री झाले. तर पुढे २०१४ मध्ये नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात ते केंद्रीय गृहमंत्री झाले. २०१९ मध्ये त्यांना देशाच्या संरक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा एकदा निवडून आले. ते सध्या नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणून काम करत आहेत.


Read More
defence minister rajnath singh
Rajnath Singh: “डॉ. आंबेडकरांना भारतरत्न नरेंद्र मोदींनी दिला”, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा दावा

काँग्रेस अनुसुचित जाती जमातीची जनगणना करण्याची मागणी करत आहे. मात्र कुठल्या जातीला किती आरक्षण देणार हे जाहीर करत नाही. काँग्रेस…

rahul gandhi on nashik agniveer death
Rahul Gandhi : नाशिकमधील अग्निविरांच्या मृत्यूनंतर राहुल गांधींचे मोदी सरकारला तीन प्रश्न; म्हणाले…

विरोधकांकडून पुन्हा एकदा अग्निपथ योजनेवरून केंद्रातील मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जातो आहे. लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधीही या योजनेवरून मोदी…

Defence Minister Rajnath Singh
“…तर भारताने पाकिस्तानला आयएमएफपेक्षा जास्त पैसा दिला असता”; राजनाथ सिंह यांचे विधान चर्चेत!

गुरेज येथील प्रचारसभेत बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा उल्लेख करत मोठं विधान केलं आहे.

Joint Commanders’ Conference in Lucknow.
आपल्या संरक्षणदलांची सद्य:स्थिती काय आहे? प्रीमियम स्टोरी

‘जेसीसी’ हे नवे पाऊल संरक्षणमंत्र्यांनी उचलले. पण संरक्षण खात्याशी निगडित संसदीय समितीलाही अधिक वाव देण्याची गरज आहे…

Defence Minister Rajnath Singh
Defence Minister Rajnath Singh: “तुम्ही आमचे आहात, पाकिस्तान तुम्हाला…”, पीओकेमधील नागरिकांना राजनाथ सिंहाचे भारतात येण्याचे आवाहन

Rajnath Singh urges PoK: भाजपाचे सरकार स्थापन करण्यात हातभार लावा, आम्ही इथे विकास करून दाखवू, असे आवाहन केंद्रीय संरक्षण मंत्री…

Rajnath Singh
Rajnath Singh : “सशस्त्र दलांनी युद्धासाठी तयार राहावं”, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून सतर्कतेचा इशारा!

Rajnath Singh : सध्या सुरू असलेल्या जागतिक संघर्षांचा संदर्भ देत संरक्षण मंत्र्यांना इशारा दिला आहे.

india s defense export in marathi
विश्लेषण: संरक्षण सामग्री निर्यातीत लक्षणीय वाढ? निर्यात कशी वाढतेय?

लष्करी सामग्रीवरील परकीय अवलंबित्व कमी करतानाच निर्यात वाढविण्यासाठी भारताने काही वर्षांपासून राबविलेल्या धोरणाचे सकारात्मक परिणाम पुढे येत आहेत.

two new US-India agreements
भारत आणि अमेरिकेने संरक्षण करारावर केली स्वाक्षरी; काय आहेत दोन नवीन करार? याचा भारताला कसा फायदा होणार?

US-India agreements देशाचे रक्षामंत्री राजनाथ सिंह २३ ऑगस्टपासून चार दिवसीय अमेरिका दौर्‍यावर होते. या दौर्‍यादरम्यान दोन्ही देशांमध्ये महत्त्वाच्या करारावर स्वाक्षर्‍या…

BJP RSS ties state polls Bangladesh unrest Rajnath Singh BJP President
भाजपा-संघामध्ये तब्बल पाच तासांची बैठक; नव्या अध्यक्षाच्या निवडीबरोबरच ‘या’ विषयावर झाली खलबतं

संघ आणि भाजपामधील सहसंबंध दुरावल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक फारच महत्त्वाची मानली जात आहे.

Union Budget 2024 Nirmala Sitharaman
Union Budget 2024 : बजेटमध्ये सगळ्यात जास्त निधी कोणत्या खात्याला मिळाला? तब्बल ६.२१ लाख कोटींची तरतूद

अर्थसंकल्पामधून सर्वात जास्त निधीची तरतूद ही भारताच्या संरक्षण खात्यासाठी करण्यात आली आहे.

Rahul gandhi on Nitin Gadkari and Rajnath Singh
“गडकरी हसत नाहीत, राजनाथ सिंह बोलत नाहीत, कारण मोदीजी…”, राहुल गांधींनी खोचक टीका करताच…

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज राज्यपालांच्या अभिभाषणावर भाषण करत असताना केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली.