राजनाथ सिंह Videos

rajnath singh (1)

राजनाथ सिंह हे भारतीय राजकारणी असून ते भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहे. तसेच ते देशाचे संरक्षणमंत्री देखील आहेत. राजनाथ सिंह यांचा जन्म १० जुलै १९५१ रोजी उत्तर प्रदेशातील भभौरा येथे झाला. त्यांनी भौतिकशास्त्रात पदव्यूत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. राजनाथ सिंह यांनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून केली होती. ते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षदेखील राहिलेले आहेत.


राजनाथ सिंह हे १९८८ मध्ये पहिल्यांदा उत्तरप्रदेश विधान परिषदेवर निवडून आले होते. तसेच १९९१ मध्ये उत्तर प्रदेशचे शिक्षणमंत्री झाले. मार्च १९९७ मध्ये ते उत्तरप्रदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्षही झाले. तर ऑक्टोबर २००० साली ते उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. १९९९ साली अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रिपदाची जबाबदारी पार पडली. २००३ साली राजनाथ सिंह अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कृषीमंत्री झाले. तर पुढे २०१४ मध्ये नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात ते केंद्रीय गृहमंत्री झाले. २०१९ मध्ये त्यांना देशाच्या संरक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा एकदा निवडून आले. ते सध्या नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणून काम करत आहेत.


Read More
Rajnath Singh on Parliament Attack
Rajnath Singh on Parliament Attack: लोकसभा घुसखोरी प्रकरणी राजनाथ सिंह काय म्हणाले?; जाणून घ्या

काल (१३ डिसेंबर) लोकसभेत झालेल्या घुसखोरी प्रकरणाचे तीव्र पडसाद राष्ट्रीय स्तरावर उमटताना दिसत आहेत. यासंदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी…