रक्षा खडसे Videos
रक्षा खडसे या भाजपाच्या खासदार आहेत. त्या रावेर लोकसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आल्या आहेत. रक्षा खडसे यांचा जन्म १३ मे १९८७ साली झाला. त्यांचे शिक्षण बी.एससी (संगणक शास्त्र) झाले आहे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचा विवाह एकनाथ खडसे यांचे पुत्र निखिल खडसे यांच्याशी झाला. जेष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या त्या सून आहेत. त्या २०१० पासून सक्रीय राजकारणात आल्या. रक्षा खडसे या कोथळी गावच्या सरपंच झाल्या. त्यानंतर जळगाव जिल्हा परिषदेत सदस्य झाल्या. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सभापती झाल्या. २०१४ ला रक्षा खडसे पहिल्यांदा खासदार झाल्या. २०१९ साली दुसऱ्यांदा खासदार झाल्या. त्यानंतर २०२४ 2साली तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या. आता त्या एनडीए सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री आहेत. रक्षा खडसे यांच्या राजकीय वाटचालीत सासरे एकनाथ खडसे यांचा मोठा वाटा राहिला आहे.
Read More