राम गोपाल वर्मा News

राम गोपाल वर्मा हे लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. दिग्दर्शनासह त्यांनी लेखन आणि निर्मिती क्षेत्रामध्येही काम केले आहे. त्यांचा जन्म ७ एप्रिल १९६२ रोजी आंध्रप्रदेश राज्यातील विजयवाडामध्ये झाला. त्यांनी विजयवाडामधील एका अभियांत्रिकी महाविद्यालयामधून बीइ ही पदवी मिळवली आहे. कॉलेजमध्ये असताना वर्मा यांना चित्रपटांबद्दल आकर्षण निर्माण झाले. कॉलेज संपल्यावर त्यांनी हैदराबादमध्ये व्हिडीओ रेंटल लायब्ररी सुरु केली. हळूहळू तेलुगू सिनेसृष्टीमधील लोकांशी त्यांची ओळख वाढत गेली. १९८९ मध्ये राम गोपाल वर्मा यांचा ‘सिवा’ हा तेलुगू चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाला मिळालेल्या उत्फुर्त प्रतिसादानंतर त्यांनी हा चित्रपट हिंदीमध्ये बनवला. हिंदी आणि तेलुगू चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी प्रामुख्याने काम केले आहे. त्यांनी ‘सत्या’, ‘रंगीला’, ‘सरकार’, ‘कंपनी’ यांसारखे दर्जदार चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. त्यासह त्यांनी ‘दिल से’, ‘अब तक छप्पन’ अशा चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे ‘राम गोपाल वर्मा की आग’, ‘रन’, ‘अग्यात’ असे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरले. समीक्षकांनीही चित्रपटाला कमी रेटेंग्स दिले. गेल्या काही वर्षांमध्ये राम गोपाल वर्मा त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. मध्यंतरी त्यांचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावरुन त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. Read More
ram-gopal-varma
‘त्या’ व्हिडीओमुळे चर्चेत असलेले राम गोपाल वर्मा इंजिनियर असूनही चित्रपटसृष्टीत कसे आले? घ्या जाणून

त्यांनी अभिनेत्रीच्या पायाला किस करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला होता.

Vijay deverakonda Ram Gopal Varma
‘लायगर’ सुपरफ्लॉप ठरल्यानंतर राम गोपाल वर्मा यांचं मोठं विधान, म्हणाले, “विजय देवरकोंडाच्या उद्धटपणामुळे…”

‘लायगर’ चित्रपटाच्या अपयशाबाबत राम गोपाल वर्मा यांनी आपलं मत मांडलं आहे. तसेच विजय देवरकोंडाचाही उल्लेख केला आहे.

Ram Gopal Varma video, Ram Gopal Varma party with ladies,
वयाच्या ६०व्या वर्षी राम गोपाल वर्मांना असं वागणं शोभतं का? अभिनेत्रीसोबतचे विचित्र फोटो, व्हिडीओ VIRAL

राम गोपाल वर्मा आणि अभिनेत्री अप्सराचा बोल्ड व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

ajay-akshay-pic
“हिंदी चित्रपट साऊथमध्ये डब करा अन्…” प्रसिद्ध दिग्दर्शकाने अक्षय-अजयला दिलं आव्हान

हिंदी भाषेच्या वादावरून सुप्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्माने बॉलिवूडकरांनाच सुनावले होते. आता त्याने एक नवं ट्विट करत बॉलिवूडच्या काही कलाकारांना…

ram gopal verma, ajay devgn, ajay devgn tweet, kiccha sudeep, hindi language controversy, kiccha sudeep tweet, किच्चा सुदीप, अजय देवगण, राम गोपाल वर्मा, अजय देवगण ट्वीट, हिंदी भाषा वाद, किच्चा सुदीप ट्वीट
“दाक्षिणात्य स्टार्सबद्दल…” अजय- किच्चा सुदीप वादानंतर प्रसिद्ध दिग्दर्शकानं बॉलिवूडकरांना सुनावलं

अजय देवगण- किच्चा सुदीप यांच्या ट्विटर वादानंतर प्रसिद्ध दिग्दर्शकानं बॉलिवूडकरांना सुनावलं आहे.