राम गोपाल वर्मा Photos

राम गोपाल वर्मा हे लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. दिग्दर्शनासह त्यांनी लेखन आणि निर्मिती क्षेत्रामध्येही काम केले आहे. त्यांचा जन्म ७ एप्रिल १९६२ रोजी आंध्रप्रदेश राज्यातील विजयवाडामध्ये झाला. त्यांनी विजयवाडामधील एका अभियांत्रिकी महाविद्यालयामधून बीइ ही पदवी मिळवली आहे. कॉलेजमध्ये असताना वर्मा यांना चित्रपटांबद्दल आकर्षण निर्माण झाले. कॉलेज संपल्यावर त्यांनी हैदराबादमध्ये व्हिडीओ रेंटल लायब्ररी सुरु केली. हळूहळू तेलुगू सिनेसृष्टीमधील लोकांशी त्यांची ओळख वाढत गेली. १९८९ मध्ये राम गोपाल वर्मा यांचा ‘सिवा’ हा तेलुगू चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाला मिळालेल्या उत्फुर्त प्रतिसादानंतर त्यांनी हा चित्रपट हिंदीमध्ये बनवला. हिंदी आणि तेलुगू चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी प्रामुख्याने काम केले आहे. त्यांनी ‘सत्या’, ‘रंगीला’, ‘सरकार’, ‘कंपनी’ यांसारखे दर्जदार चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. त्यासह त्यांनी ‘दिल से’, ‘अब तक छप्पन’ अशा चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे ‘राम गोपाल वर्मा की आग’, ‘रन’, ‘अग्यात’ असे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरले. समीक्षकांनीही चित्रपटाला कमी रेटेंग्स दिले. गेल्या काही वर्षांमध्ये राम गोपाल वर्मा त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. मध्यंतरी त्यांचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावरुन त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. Read More
15 Photos
रामगोपाल वर्माने पायावर Kiss केलेली ‘ती’ अभिनेत्री कोण? कधीकाळी तिनेच मारलेली दिग्दर्शकाच्या कानशिलात

राम गोपाल वर्माने या अभिनेत्रीच्या पायावर किस करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे