राणी मुखर्जी ही एक प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री आहे. बॉलीवूडच्या सुपरहिट चित्रपट ‘कुछ कुछ होता’मध्ये टीनाची भूमिका साकारण्यासाठी तिला सर्वात जास्त लक्षात ठेवले जाते. तिने १९९७ च्या ‘राजा की आयेगी बारात’ या चित्रपटातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं, पण तिचा हा चित्रपट चांगलाच फ्लॉप झाला. १९९८ च्या आमिर खानच्या ‘गुलाम’ चित्रपटात राणीची दखल घेतली गेली. यातलं या दोघांवर चित्रित झालेलं ‘आती क्या खंडाला’ हे गाणं चांगलंच गाजलं. राणीचे वडील, राम मुखर्जी हे चित्रपट दिग्दर्शक आणि फिल्मालय स्टुडिओच्या संस्थापकांपैकी एक होते शिवाय तिची आई कृष्णा मुखर्जी यासुद्धा पार्श्वगायिका आहेत. राणीचा मोठा भाऊ राजा मुखर्जी हा चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आहे. राणीची मावशी, देबश्री रॉय, बंगाली चित्रपट अभिनेत्री आहे आणि तिची चुलत बहीण काजोल, अभिनेता अजय देवगणची पत्नी आणि एक उत्तम अभिनेत्री आहे. राणी मुखर्जी या क्षेत्रात यायला फारशी उत्सुक नव्हती. ‘युवा’ आणि ‘बंटी और बबली’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिषेक बच्चनबरोबर राणीचं नाव जोडलं गेलं.. अभिषेकने पुढे जाऊन ऐश्वर्या रायशी लग्न केल्यावर हे प्रेमप्रकरण संपुष्टात आले. २१ एप्रिल २०१४ रोजी राणीने इटलीमध्ये आदित्य चोप्राशी लग्न केले. या जोडप्याला आदिरा नावाची मुलगी आहे.Read More
Rani Mukherji Fitness: आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या राणीने अनेक संस्मरणीय चित्रपटांमध्ये काम केले आहे. तथापि, तिच्या ‘अय्या’ चित्रपटातील…
चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या अनेकदा चर्चा होताना दिसतात. आता शाहरुख खानने त्याच्या गाजलेला चित्रपट ‘कभी अलविदा ना कहना’ या चित्रपटात पाकिस्तानी कलाकाराच्या…