राणी मुखर्जी Photos

राणी मुखर्जी ही एक प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री आहे. बॉलीवूडच्या सुपरहिट चित्रपट ‘कुछ कुछ होता’मध्ये टीनाची भूमिका साकारण्यासाठी तिला सर्वात जास्त लक्षात ठेवले जाते. तिने १९९७ च्या ‘राजा की आयेगी बारात’ या चित्रपटातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं, पण तिचा हा चित्रपट चांगलाच फ्लॉप झाला. १९९८ च्या आमिर खानच्या ‘गुलाम’ चित्रपटात राणीची दखल घेतली गेली. यातलं या दोघांवर चित्रित झालेलं ‘आती क्या खंडाला’ हे गाणं चांगलंच गाजलं. राणीचे वडील, राम मुखर्जी हे चित्रपट दिग्दर्शक आणि फिल्मालय स्टुडिओच्या संस्थापकांपैकी एक होते शिवाय तिची आई कृष्णा मुखर्जी यासुद्धा पार्श्वगायिका आहेत. राणीचा मोठा भाऊ राजा मुखर्जी हा चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आहे. राणीची मावशी, देबश्री रॉय, बंगाली चित्रपट अभिनेत्री आहे आणि तिची चुलत बहीण काजोल, अभिनेता अजय देवगणची पत्नी आणि एक उत्तम अभिनेत्री आहे. राणी मुखर्जी या क्षेत्रात यायला फारशी उत्सुक नव्हती. ‘युवा’ आणि ‘बंटी और बबली’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिषेक बच्चनबरोबर राणीचं नाव जोडलं गेलं.. अभिषेकने पुढे जाऊन ऐश्वर्या रायशी लग्न केल्यावर हे प्रेमप्रकरण संपुष्टात आले. २१ एप्रिल २०१४ रोजी राणीने इटलीमध्ये आदित्य चोप्राशी लग्न केले. या जोडप्याला आदिरा नावाची मुलगी आहे.Read More
dangal to maharaja these 10 Indian movies were a blockbuster in china
11 Photos
‘या’ 10 भारतीय चित्रपटांनी चीनी नागरिकांना लावलं वेड; केली रेकॉर्डब्रेक कमाई, आमिर खानच्या ‘दंगल’ने…

चीनमध्ये सर्वाधिक कमाई करणारा आमिर खानचा दंगल सिनेमा आहे, किती केलेली आहे कमाई? जाणून घ्या आकडा (सर्व फोटो साभार- सोशल…

top 10 richest actresses of bollywood
18 Photos
Photo : ऐश्वर्या ते दीपिका, बॉलीवूडच्या ‘या’१० अभिनेत्री कोट्यवधीच्या मालकीण; संपत्तीचा आकडा वाचून व्हाल थक्क!

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या कमाईच्या बाबतीत अभिनेत्यांनाही मागे टाकतात. कोण आहेत त्या अभिनेत्री? जाणून घ्या…

bollywood actress
15 Photos
अभिनयाबरोबरच ‘या’ अभिनेत्री आहेत नृत्यामध्ये पारंगत; केवळ हिपहॉपच नाही तर शास्त्रीय नृत्यांमध्येही आहेत तरबेज

बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्री ज्या अभिनयाबरोबर नृत्यामध्येही आहेत तरबेज

bollywood actress cate fight
13 Photos
कुणी अभिनेत्यांसाठी, तर कुणी चित्रपटांसाठी भांडलं; बोलणंच काय तर एकमेकींचं तोंडही बघत नाहीत ‘या’ अभिनेत्री

बॉलिवूडमधील टॉपच्या अशा अभिनेत्री ज्या एकेकाळी चांगल्या मैत्रिणी होत्या मात्र, आता त्यांच्या ३६चा आकडा आहे

Rani Mukherjee
12 Photos
Rani Mukerji Birthday: अभिषेक बच्चन, गोविंदा अन्… अभिनयाबरोबरच अफेअरमुळेही चर्चेत राहिलेली राणी मुखर्जी

आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपट देणारी राणी चित्रपटांसोबतच खासगी आयुष्याचीमुळेही चर्चेत राहिली.

katrina amitabh deepika
13 Photos
पैसे नाही, चांगला चित्रपट महत्वाचा..’या’ कलाकारांनी आकरले फक्त काही रुपये मानधन

एखाद्या चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली किंवा एखादा ड्रीम रोल मिळाला तर कलाकार मानधनही अगदी मोजके आकारतात. बॉलिवूडमध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत.…