२०१९ मध्ये एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये एक साठ-पासष्ठ वर्षांची महिला रेल्वे स्टेशनवर बसून लता मंगेशकर यांचे ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणं गात होती. रानू मंडल (Ranu Mandal ) असे त्या महिलेचे नाव आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे रानू रातोरात स्टार बनल्या. पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या रानू मंडल यांचे जीवन गरीबीमध्ये गेले. पती बबलू मंडल यांच्या निधनानंतर त्यांना रेल्वे स्थानकावर राहावे लागले. तेव्हा त्या गाणं गात भीक मागत जगत होत्या. त्यांच्या गाण्याचा व्हिडीओ संगीत दिग्दर्शक हिमेश रेशमिया यांच्यापर्यंत पोहोचला.
हिमेश यांच्या ‘हॅपी हार्डी आणि हीर’ चित्रपटामध्ये त्यांनी गाणी गायली. त्यांना इतरांकडूनही कामाच्या ऑफर्स येऊ लागल्या. प्रसिद्धीच्या प्रकाशझोतामध्ये असताना रानू मंडल यांचे चाहत्यांशी वाईट पद्धतीने वागणूक करण्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. कालातरांने लोकप्रियतेमध्ये घट होऊ लागली. मध्यतंरी त्यांच्यावर चरित्रपट येणार असल्याचे म्हटले जात होते. Read More