राशी भविष्य News
जन्माच्या वेळी नवग्रहाची स्थिती पाहून प्रत्येकाची कुंडली/ जन्मपत्रिका तयार केली जाते. तेव्हाच्या स्थितीवरुन त्या-त्या व्यक्तिची रास (Rashi)ठरत असते. नवग्रह जेव्हा सूर्याभोवती फिरतात तेव्हा सूर्य हा ठराविक काळानंतर एका तारकासमूहातून दुसऱ्या तारकासमूहात जातो असे म्हटले जाते. या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हटले जाते. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही सव्वादोन नक्षत्रे एकत्र येऊन जो तारकासमूह बनतो त्याला राशी म्हणतात.
असे एकूण १२ तारकासमूह म्हणजेच राशी आहेत. त्यांनी नावे मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशी आहेत. सर्व नवग्रह हे नियमितपणे सूर्याच्या भोवती फिरत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार, त्याच्या या कृतीचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. त्यांच्या स्थितीचा अंदाज लावून ठराविक गोष्टीची माहिती आपण ज्योतिषशास्त्राच्या मदतीने मिळवू शकतो. यातील एक महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे राशी भविष्य होय. राशी भविष्य यामध्ये प्रत्येक राशीच्या व्यक्तीबरोबर दिवसभरात काय-काय घडू शकते याचा काही प्रमाणामध्ये अंदाज लावलेला असतो.
लोकसत्ता डॉट कॉमच्या राशी भविष्य सदरामध्ये दैनंदिन राशी भविष्याशी(Daily Rashibhavishya) संबंधित बातम्या वाचायला मिळतील. त्याशिवाय ठराविक महिन्यामध्ये ज्योतिषशास्त्राशी निगडीत महत्त्वपूर्ण घटना यांची माहिती देखील वाचकांना वाचायला मिळेल.
Read More