अभिनेत्री रश्मिका मंदानाचं नाव सध्या देशभरातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं. २०१६ साली ‘किरिक पार्टी’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. ५ एप्रिल १९९६ साली बंगळुरू, कर्नाटक येथे जन्मलेल्या रश्मिकानं वयाच्या अवघ्या २६ वर्षी अभिनय क्षेत्रात यश आणि प्रसिद्धी दोन्ही मिळवलं आहे. किरिक पार्टी (२०१६), अंजनी पुत्रा (२०१७), चमक (२०१७), चालो (२०१८), गीता गोविंदम (२०१८) आणि यजमान (२०१९) हे तिचे गाजलेले चित्रपट आहेत. कर्नाटकातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या रश्मिकाला अभिनयाची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नाही. मात्र या क्षेत्रात तिनं स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर प्रचंड यश मिळवलं आहे. आज ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. रश्मिकाला सुरुवातीपासूनच अभिनय आणि मॉडेलिंगची आवड होती. तिने महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच मॉडेलिंगला सुरुवात केली होती. तिनं त्यावेळी बऱ्याच जाहिरातींमध्ये काम केलं आहे. Read More
Allu Arjun : चित्रपटगृहातील चेंगराचेंगरीनंतर अभिनेता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती. एक रात्र तुरुंगात काढल्यानंतर अभिनेत्याची जामिनावर सुटका झाली…