राष्ट्रीय समाज पक्ष हा महाराष्ट्रातील राजकीय पक्ष आहे. या पक्षाची स्थापना २००३ मध्ये झाली होती. महादेव जानकर हे या पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. २००९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष हा रिपब्लिकन लेफ्ट डेमोक्राटिक फ्रंटचा भाग होता.
२०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष हा महायुतीचा भाग होता. पक्षाने निवडणुकीत ६ उमेदवार उभे केले होते. यापैकी दौंडमधून पक्षाचे उमेदवार राहुल कुल विजयी झाले होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष हा महायुतीचा भाग होता. पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी परभणीतून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या संजय जाधव यांनी पराभूत केले. राष्ट्रीय समाज पक्षाचा विधानसभा आणि विधान परिषदेत प्रत्येकी एक आमदार आहे.