भारतीय उद्योजक व टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा (Ratan Tata) यांचं ०९ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री वृद्धापकाळाने निधन झालं. भारतासह जगभरात टाटा उद्योग समूहाची (TATA Group) मोठी वाढ रतन टाटा यांच्या कारकिर्दीत झाली. टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे रतन टाटा हे पणतू होते. १९९० साली त्यांनी टाटा समूहाची धुरा आपल्या हाती घेतली. त्यानंतर रतन टाटांच्या पुढच्या २२ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी टाटा समूहाला जागतिक स्तरावर मोठं नाव मिळवून दिलं.
उद्योग विश्वाबरोबरच रतन टाटांनी जपलेलं सामाजिक भान व परोपकारी वृत्तीमुळे त्यांनी समाजाच्या सर्वच स्तरातली खूप सारी माणसं जोडली. त्यांच्या याच स्वभावामुळे सामाजिक, राजकीय, आर्थिक, कला, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रातल्या व्यक्तींना त्यांनी प्रभावित केलं.