रविचंद्रन अश्विन Videos

रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) हा सध्या भारतातील सर्वोच्च फिरकीपटूंपैकी एक आहे. त्याचा जन्म १७ सप्टेंबर १९८६ रोजी चैन्नई, तमिळनाडू येथे झाला. त्याचे वडील चैन्नईमध्ये क्लब क्रिकेट खेळत असत. अश्विनने बीटेकची पदवी मिळवली आहे. क्रिकेटची आवड असल्यामुळे त्याला क्रिकेट अकादमीमध्ये शिकण्यासाठी पाठवण्यात आले.


राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत अश्विनने २०१०-११ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. तो सर्वोत्तम कसोटी अष्टपैलूंपैकी एक आहे असे म्हटले जाते. त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४५० पेक्षा जास्त बळी घेतले आहेत.


२०१६ मध्ये आयसीसी बोर्डाने त्याला क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार हा पुरस्कार बहाल केला. आयपीएलमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे. मंकड पद्धतीने बाद केल्यामुळे तो अनेकदा चर्चेत राहिला आहे. त्याला अ‍ॅश या टोपणनावाने देखील संबोधले जाते.


Read More