रविकांत तुपकर News

रविकांत तुपकर यांना शेतकरी नेता म्हणून ओळखलं जातं. गेल्या २२ वर्षापासून रविकांत तुपकर हे शेतकरी चळवळीसाठी लढा देत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आपल्या वेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला हादरवणारे नेतृत्व म्हणून रविकांत तुपकर यांच्याकडे पाहिलं जातं. बुलढाणा जिल्ह्यातील सावळा गावात शेतकरी कुटुंबात रविकांत तुपकर यांचा १३ मे १९८५ रोजी जन्म झाला. कुटुंबातील कुणालाच राजकारणाचा वारसा नाही. आई-वडील शेतकरी. बारावीपर्यंतचे शिक्षण बुलढाणा जिल्ह्यात झाले.कला शाखेतून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. वडिलांचा शेती हा परंपरागत व्यवसाय, त्याला दुग्धव्यवसायाची जोड. तुपकरांनी दररोज सकाळी घरोघरी दूध वाटपाचे काम केलेलं आहे. शेतकरी चळवळीच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली आणि रविकांत तुपकर यांचा महाराष्ट्रात नावलौकिक झाला. २०१४ आणि २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी करूनही त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यानंतर त्यांच्यावर वस्त्रोद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. विदर्भात सर्वदूर पिकणाऱ्या कापूस आणि सोयाबिनचा प्रश्न त्यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेला. रविकांत तुपकर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते असले तरी २०१९ पासून ते स्वतंत्रपणे काम करत आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बुलढाणा मतदारसंघातून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला.


Read More
ravikant tupkar s krantikari shetkari sanghatana
रविकांत तुपकरांची क्रांतिकारी शेतकरी संघटना महाविकास आघाडीसोबत जाण्यास अनुकूल

आघाडी सोबत चर्चा सुरू असून त्यांच्याकडून सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा देखील तुपकर यांनी व्यक्त केली.

mumbai police marathi news
नेता अडकला, पण कार्यकर्ते खंबीर…मुंबईच्या रस्त्यावर आत्महत्येचे प्रात्यक्षिक…

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वर्षा बंगल्यावरील आंदोलनापूर्वी मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली.

Ravikant Tupkar
Ravikant Tupkar : “वर्षा बंगल्यात घुसणार, काही घडल्यास…”, रविकांत तुपकरांचा राज्य सरकारला इशारा

शेतकरी नेते रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आक्रमक झाले आहेत. राज्यातील सोयाबीन आणि कापसाच्या दरवाढीसाठी आंदोलनाचा इशारा दिला.

ravikant tupkar maharashtra krantikari aghadi held protest march for farmers
Ravikant Tupkar Protest : महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीचा मेहकरात ‘आक्रोश’; शेतकऱ्यांना आठ दिवसांत भरपाई द्या अन्यथा…

पीकविमा, नुकसान भरपाई, कर्जमुक्ती व शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी  नेतृत्वाखाली  घोषणाबाजी करत निघालेल्या या मोर्चाने मेहकर शहर दणाणून सोडले.

lokjagar mla bacchu kadu ravikant tupkar to form third alliance for upcoming assembly elections in maharashtra
लोकजागर : बाहुल्यांची आघाडी!

आजवर कडू विजयी होत आले ते धर्मनिरपेक्षतेची झुल पांघरून. त्यामुळे त्यांना हिंदू, मुस्लीम अशी दोहोंची मते मिळत गेली.

Sadabhau Khot On Raju Shetti
“स्वतःच्या अहंकारामुळे संघटनेला ग्रहण”, सदाभाऊ खोत यांची राजू शेट्टी यांच्यावर टीका

रविकांत तुपकर यांना संघटनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यामुळे राजू शेट्टी यांच्यावर टीका होत आहे.

Ravikant Tupkar
‘स्वाभिमानी’तून हकालपट्टीच्या कारवाईनंतर रविकांत तुपकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझा काय गुन्हा, मला…”

रविकांत तुपकर यांनी अनेकदा पक्षविरोधी भूमिका घेतल्याने ही कारावाई करण्यात आल्याचं जालिंदर पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.