रविकांत तुपकर Videos

रविकांत तुपकर यांना शेतकरी नेता म्हणून ओळखलं जातं. गेल्या २२ वर्षापासून रविकांत तुपकर हे शेतकरी चळवळीसाठी लढा देत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आपल्या वेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला हादरवणारे नेतृत्व म्हणून रविकांत तुपकर यांच्याकडे पाहिलं जातं. बुलढाणा जिल्ह्यातील सावळा गावात शेतकरी कुटुंबात रविकांत तुपकर यांचा १३ मे १९८५ रोजी जन्म झाला. कुटुंबातील कुणालाच राजकारणाचा वारसा नाही. आई-वडील शेतकरी. बारावीपर्यंतचे शिक्षण बुलढाणा जिल्ह्यात झाले.कला शाखेतून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. वडिलांचा शेती हा परंपरागत व्यवसाय, त्याला दुग्धव्यवसायाची जोड. तुपकरांनी दररोज सकाळी घरोघरी दूध वाटपाचे काम केलेलं आहे. शेतकरी चळवळीच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली आणि रविकांत तुपकर यांचा महाराष्ट्रात नावलौकिक झाला. २०१४ आणि २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी करूनही त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यानंतर त्यांच्यावर वस्त्रोद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. विदर्भात सर्वदूर पिकणाऱ्या कापूस आणि सोयाबिनचा प्रश्न त्यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेला. रविकांत तुपकर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते असले तरी २०१९ पासून ते स्वतंत्रपणे काम करत आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बुलढाणा मतदारसंघातून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला.


Read More
Ravikant Tupkar will meet Sharad Pawar and Uddhav Thackeray
Ravikant Tupkar on MVA: ठाकरेंशी, शरद पवारांची भेट घेणार; रविकांत तुपकर काय म्हणाले?

शेतकरी नेते रविकांत तुपकर हे महाविकास आघाडीबरोबर जाण्याची शक्यता आहे. याबद्दल त्यांनी स्वतः माहिती देत कार्यकर्त्यांची ही इच्छा असल्याचं त्यांनी…

ताज्या बातम्या