रवींद्र जडेजा Photos
अष्टपैलू रवींद्र जडेजा भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू आहे. त्याचा जन्म ६ डिसेंबर १९८८ रोजी सौराष्ट्रातील नवगम खेड येथे झाला. जडेजाने २००९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो भारतीय संघातील तिन्ही फॉरमॅटचा नियमित सदस्य आहे. फिरकी गोलंदाजी, आक्रमक फलंदाजी आणि वेगवान क्षेत्ररक्षण ही त्याची खासियत आहे. त्याने आपल्या अचूक आणि वेगवान थ्रोवर सामन्यादरम्यान अनेक खेळाडूंना धावबाद केले आहे. त्याला सर जडेजादेखील म्हणतात.