श्री. श्री. रविशंकर Photos

रविशंकर (Ravishankar) हे एक भारतीय आध्यात्मिक गुरु आहेत. त्यांचे अनुयायी त्यांना “श्री श्री रविशंकर” किंवा “गुरुजी” या नावांनी संबोधतात. त्यांना गुरुदेव असेही म्हटले जाते. १३ मे १९५६ रोजी तमिळनाडूमध्ये त्यांचा जन्म झाला. लहानपणापासून त्यांचा अध्यात्माकडे कल होता. महात्मा गांधी यांचे निकटवर्तीय असलेले सुधाकर चतुर्वेदी हे त्यांचे पहिले गुरु आहेत.

बंगळुरु विद्यापीठातून पदवी मिळवल्यानंतर त्यांनी महाऋषी महेश योगी यांच्याकडून वैदिक विज्ञानाचे धडे गिरवले. त्यांच्या ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन या संस्थेमध्ये रविशंकर यांनी काही वर्ष काम केले. १९८१ मध्ये त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनची स्थापना केली. २०१६ मध्ये भारत सरकारने पद्मविभूषण हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.Read More