भारतीय रिझर्व बँक (Reserve Bank of India) ही भारतामधील मध्यवर्ती बॅंक आणि नियामक संस्था आहे. चलनी नोटांची छपाई गरजेनुसार करणे, आर्थिक स्थिती नियंत्रणात ठेवणे आणि चलनाचे रक्षण करणे ही या संस्थेची प्रमुख ध्येये आहेत.
देशामध्ये मध्यवर्ती एक बँक (Central Bank)असावी अशी संकल्पना १७७२ मध्ये मांडण्यात आली होती. १९२६ मध्ये सेंट्रल बँकिंगच्या उत्पत्तीची सुरुवात केली गेली. पुढे ६ मार्च १९३४ रोजी आर. बी .आय. कायदा १९३४ संमत करण्यात आला आणि १ एप्रिल १९३५ रोजी रिझर्व बँक ऑफ इंडियाची (RBI) स्थापना करण्यात आली. याचे मुख्यालय भारताची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये आहे.
यामध्ये गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर, दोन वित्त मंत्रालयाचे प्रतिनिधी, दहा सरकारने नामनिर्देशित संचालक आणि चार स्थानिक मंडळांचे प्रतिनिधी असतात. भारतीय रिझर्व बँकमध्ये (RBI) २१ सदस्यीय केंद्रीय संचालक मंडळ आहेत. Read More
MuleHunter AI भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी ‘MuleHunter.AI’ नावाचे कृत्रिम बुद्धिमत्ता/मशीन लर्निंग-आधारित मॉडेल सादर केले.
खासगी क्षेत्रातील बँकांच्या संचालकांच्या परिषदेनिमित्त केलेल्या बीजभाषणात दास म्हणाले की, बँकांकडून व्यवसायाच्या अयोग्य पद्धतींचा अवलंब अल्पकालीन फायद्यासाठी केला जातो.
रिझर्व्ह बँकेसह जागतिक स्तरावरील मध्यवर्ती बँका विविधता आणण्यासाठी परकीय चलन साठ्यात सोन्याचे प्रमाण वाढवत आहेत. चलनातील चढउतार आणि आर्थिक धक्क्यांपासून…