रिलायन्स जिओ Videos
रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड म्हणजेच जिओ ही भारतामधील सर्वात मोठ्या टेलिकम्युनिकेशन कंपन्यांपैकी एक आहे. गुजरातमधील अहमदाबाहमध्ये फेब्रुवारी २००७ मध्ये इन्फोटेल ब्रॉडकास्ट सर्व्हिसेस लिमिडेट (IBSL) या कंपनीची स्थापना करण्यात आली. पुढे जून २०१० मध्ये मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने या कंपनीचे ९५ टक्के शेअर्स खरेदी केले. सुरुवातीला आयबीएसएलचे नेटवर्क भारतातील २२ ठिकाणी उपलब्ध होते. काही कालावधीनंतर या कंपनीचे नाव बदलून रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड हे नवीन नाव ठेवण्यात आले. २०१५ मध्ये जिओ नेटवर्कचे भारतामध्ये सॉफ्ट लॉन्च करण्यात आले. सप्टेंबर २०१६ पासून जिओची सेवा ग्राहकांसाठी खुली करण्यात आली. सध्या जिओ कंपनी 4G, 4G+ सेवा संपूर्ण भारतामध्ये तर 5G नेटवर्क सेवा देशातील काही ठराविक शहरांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीद्वारे 6G नेटवर्कवर काम सुरु आहे. रिलायन्स जिओद्वारे सर्वप्रथम 4G नेटवर्क सेवा कमीत कमी पैश्यांमध्ये पुरवण्यात आली. त्यासह कंपनीने ग्राहकांना अन्य सुविधा देखील देण्यात आल्या. अनेक सोयीसुविधांमुळे अन्य टेलिकॉम कंपनीच्या सेवा वापरणारे ग्राहक मोठ्या प्रमाणामध्ये जिओकडे वळले. जिओच्या 4G क्रांतीमुळे भारतामध्ये खूप बदल झाले. Read More