रिया चक्रवर्ती News
बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने छोट्या पडद्यापासून मनोरंजन विश्वातील करिअरला सुरुवात केली. तिने तेलुगु व हिंदी चित्रपटात काम केलं आहे. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या ‘तुनिगा तुनिगा’ या चित्रपटातून तिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर ‘मेरे डॅड की मारुती’ या चित्रपटातून २०१३ साली तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. ‘बॅंक चोर’, ‘सोनाली केबल’, ‘हाफ गर्लफ्रेंड’, ‘जलेबी’, ‘चेहरे’, ‘दोबारा’ या चित्रपटांतही रिया झळकली. दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतबरोबर तिचे प्रेमसंबंध होते. सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी रिया चर्चेत होती. याप्रकरणी रियाला काही दिवस तुरुंगातही ठेवण्यात आलं होतं.Read More