सचिन तेंडुलकर Photos
सचिनने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १९८९ साली पाकिस्तान कराची येथे खेळला. पुढे काही सामन्यांमध्ये त्याने चांगली धावसंख्या केली. १९९४ मध्ये त्याने श्रीलंकेमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामन्यामध्ये पहिले शतक झळकवले. सचिनने आत्तापर्यंत अनेक जुने विक्रम मोडत काढत नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर १०० शतक करणारा तो पहिला आणि एकमेव खेळाडू आहे.
सचिनने एकूण ६६४ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले आणि ३४,३५७ धावा केल्या आहेत. फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. १६ नोव्हेंबर २०१३ रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर त्याने २०० वा कसोटी सामना खेळल्यानंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.Read More