सचिन वाझे Photos

सचिन वाझे (Sachin Waze) हे मुंबई एन्काउंटर स्क्वॉडमध्ये ‘एनकाउंटर स्पेशालिस्ट’ आहेत. वाझे यांचा जन्म २२ फेब्रुवारी १९७२ रोजी महाराष्ट्रातील कोल्हापूर (Kolhapur) येथे झाला. ते १९९० मध्ये राज्य पोलीस सेवेत रुजू झाले. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम केले आहे. चकमकीमध्ये त्यांनी तब्बल ६३ गुन्हेगारांचा एनकाउंटर केले आहे असे सांगितले जाते.

सुरुवातीला सुपरकॉप वाटणारे वाझे चकमकीमध्ये एकदाही जखमी न झाल्याने त्यांच्यावर लोकांना संशय येऊ लागला. पुढे ख्वाजा युनूस यांच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले. त्यांना अटकही झाली. पण जामीन मिळवून त्यांनी २०१७ मध्ये पुन्हा पोलीस दलामध्ये काम करायला सुरुवात केली.

२०२१ मध्ये अँटिलिया बॉम्ब प्रकरण, मनसुख हिरेन हत्या आणि आर्थिक गैरव्यवहारातचे आरोप या प्रकरणांमुळे ते चर्चेत आले होते. सध्या ते तुरुंगामध्ये आहेत.
Read More