बॉलिवूडच्या खान मंडळींपैकी सैफ अली खान याची आजही प्रचंड क्रेझ आहे. अभिनेत्री शर्मिला टागोर आणि क्रिकेटर टायगर पतौडी यांच्या पोटी जन्मलेल्या सैफने १९९३ च्या ‘परंपरा’ या चित्रपटातून मनोरंजनविश्वात पदार्पण केलं. ‘क्या केहना’ या चित्रपटातून सैफला मुख्य अभिनेता म्हणून ओळख मिळाली आणि त्यांनंतर त्याने ‘दिल चाहता है’, ‘कल हो न हो’, ‘हम तुम’, ‘परिणीता’, ‘ओंकारा’ ‘तारा रम पम’, ‘एक हसिना थी’, ‘लव आज कल’सारख्या चित्रपटातून स्वतःला एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून सिद्ध केलं. ओटीटी विश्वात सैफ अली खान प्रथम पदार्पण करणारा बॉलिवूड स्टार ठरला. त्याच्या ‘सेक्रेड गेम्स’ आणि ‘तांडव’ या वेबसीरिज चांगल्याच गाजल्या. याबरोबरच त्याच्या लव्ह लाईफची सुद्धा जबरदस्त चर्चा झाली. काही काल अमृता सिंगबरोबर संसार थाटल्यावर त्याने तिच्याकडून घटस्फोट घेतला आणि बॉलिवूडची बेबो करीना कपूर हिच्याशी लग्नगाठ बांधली, आज सैफला करीनाकडून २ मुलं आणि अमृताकडून २ मुलं आहेत. सैफची मुलगी सारा अली खानसुद्धा आघाडीची अभिनेत्री आहे.Read More
घरात शिरलेल्या अज्ञात व्यक्तीने केलेल्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अभिनेता सैफवरील शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून, त्याच्या जिवाला कोणताही…