बॉलिवूडचा बजरंगी भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान आज बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. बॉलिवूडमधील सर्वाधिक महागड्या कलाकारांपैकी एक म्हणून सलमान खानला ओळखले जाते. कोणतीही भूमिका असो सलमान त्याला पूर्णपणे न्याय देतो. सलमानने १९८८ मध्ये ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाने त्याला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळवून दिली. कुठल्या ना कुठल्या कारणावरून सतत वादात राहणारा सलमान अद्याप अविवाहित आहे. अनेक अभिनेत्रींशी त्याचं नाव जोडलं गेलं असलं तरी संगीता बिजलानी व एश्वर्या रायसोबतची प्रकरणं विशेष गाजली होती. Read More