समाजवादी पार्टी Photos

समाजवादी पक्ष (Samajwadi Party) हा भारतातील एक प्रमुख राजकीय पक्ष असून तो उत्तर प्रदेश राज्यात सक्रिय आहे. या पक्षाची स्थापना ४ ऑक्टोबर १९९२ रोजी झाली होती. दिवंगत मुलायमसिंह यादव हे या पक्षाचे संस्थापक आहेत. त्यांचे पुत्र तथा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे पक्षाचे अध्यक्ष आहेत. सध्या ३७ सदस्यांसह समाजवादी पक्ष हा लोकसभेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष आहे.


पक्षाचे बलस्थान हे उत्तरप्रदेश असले तरी देशातील इतर राज्यांमध्येही या पक्षाची लक्षणीय उपस्थिती आहे. पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये ४ वेळा सत्ता स्थापन केली आहे. तीन वेळा मुलायमसिंह यादव यांच्या नेतृत्वात तर एक वेळा त्यांचे चिरंजीव अखिलेश यादव यांच्या नेतृत्तवात. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला पराभव पत्करावा लागला होता. ४०३ जागांपैकी समाजवादी पक्ष आणि काँग्रेस युतीला केवळ ४७ जागांवर यश मिळाले. तर भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ३१२ जागा जिंकत राज्यात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापन केली होती. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीतही समाजवादी पक्षाचा पराभव झाला होता. समावादी पक्ष युतीला केवळ १११ जागा जिंकता आल्या. तेव्हाही राज्यात भाजप आघाडीने बहुमत मिळवत राज्यात सत्ता स्थापन केली.


२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाकडून भाजपला मोठा फटका बसला होता. पक्षाला केवळ ५ जागा जिंकता आल्या. त्यानंतर अलिकडेच हा पक्ष इंडिया आघाडीत सहभागी झाला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने ३७ जागा जिंकल्या आणि १८ व्या लोकसभेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक मोठा पक्ष झाला.


Read More
Mulayam Singh Yadav Death
15 Photos
PHOTO : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री ते देशाचे संरक्षणमंत्री; अशी होती मुलायम सिंह यांची राजकीय कारकीर्द

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे (सपा) संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे आज पहाटे उपचारादरम्यान निधन झाले.

ताज्या बातम्या