
भिडे गुरुजी या नावाने प्रसिद्ध असलेले संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांचे मूळ नाव मनोहर भिडे असं आहे आणि ते सातारा जिल्ह्यातील सबनीसवाडीचे आहेत. भिडे उच्चशिक्षित आहेत. १९८० च्या दशकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही ते कार्यरत होते. हिंदुत्वाबद्दल अतिशय आग्रही आणि आक्रमक अशी त्यांची भूमिका आहे. त्यांच्या विविध वक्तव्यांमुळे मोठे वाद निर्माण झाल्याचेही दिसून आले आहे. याशिवाय त्यांना मानणारा तरुणवर्ग हा मोठ्याप्रमाणात आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेद्वारे त्यांचे कार्य चालते. २०१४ मध्ये रायगडमध्ये त्यांची आणि पंतप्रधान मोदींची भेट झाली होती.
सध्या ते सांगलीत वास्तव्यास आहेत. महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी विचारसरणीच्या वर्तुळातील एक महत्त्वाचे व्यक्ती म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते.