मुंबई ते नागपूर असा ७०१ किलोमीटरचा प्रवास अवघ्या आठ तासांत पार करता येईल असे उद्दिष्ट्य ठेवलेला समृद्धी महामार्ग अंदाजे ५५ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. दहा जिल्ह्यांमधील ३९० गावांना हा महामार्ग जोडत असून संपूर्ण महाराष्ट्राच्या अर्थकारणावर या महामार्गामुळे चांगला परिणाम होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी असा ५२० किमीचा टप्पा ११ डिसेंबरपासून वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग ७०१ किमीचा असून यातील ५२० किमीच्या नागपूर ते शिर्डी महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबरला होत आहे. समृध्दी महामार्गाच्या पाहणी दौ-याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचे सारथ्य खुद्द उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्याचे पाहायला मिळाले. या घटनेची समाजमाध्यमात चांगलीच चर्चाही रंगली.Read More
Buldhana Samruddhi Highway Accident : लोकार्पण झाल्यापासून अपघाताने गाजत असलेल्या समृद्धी महामार्गावर आज झालेल्या भीषण अपघातात दोन प्रवाशांचा होरपळून दुर्देवी…
समृद्धी महामार्गावर वाहनचालकांच्या सोयीसाठी स्वच्छतागृह, इंधन केंद्र, वाहन दुरुस्ती केंद्र, उपाहारगृह यांसारख्या मूलभूत सुविधांनी सज्ज एकूण ३० केंद्रे उभारण्यात येणार…
एमएसआरडीसीच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास वाढवण बंदरालगच्या १०७ गावांमधील ५१२ चौ. किमी क्षेत्रावर नवे महानगर वसणार आहे. व्यावसायिक, निवासी संकुल, रुग्णालय,…