संजय राऊत Photos
संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेनेचं मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक आणि राज्यसभेचे खासदार आहेत. ते शिवसेनेच्या (Shivsena) वतीने महाराष्ट्रातून तीन वेळा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. ते २००४ पासून आजपर्यंत सलगपणे राज्यसभेचे सदस्य आहेत. २००५ पासून त्यांच्याकडे राज्यसभेतील शिवसेनेचे नेतेपदही देण्यात आलं. याशिवाय त्यांनी अनेक संसदीय समित्यांवर सदस्य म्हणूनही काम केलं आहे. संजय राऊत हे सुरुवातीच्या काळात मुंबईत पत्रकार म्हणून काम पाहत होते. पत्रकारीतेचं काम करत असतानाच त्यांची शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याशी परिचय झाला. त्यांच्यामुळेच ते राजकारणात आले आणि पुढे ते बाळासाहेबांच्या विश्वासातील नेते बनले. शिवसेनेत आल्यानंतर त्यांच्यावर सामना या मुखपत्रात महत्त्वाची जबाबदारी टाकण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सामनातील बहुचर्चित अग्रलेख आणि रोखठोक सदरं देखील संजय राऊत यांनी गाजवली. प्रसार माध्यमांमध्ये शिवसेनेची भूमिका प्रखरपणे मांडण्यासाठी ते ओळखले जातात. ते शिवसेनेचे प्रवक्ते देखील आहेत. राज्यात महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या स्थापनेतही त्यांचा मोलाचा वाटा आहे.”}” data-sheets-userformat=”{“2″:4673,”3”:{“1″:0},”9″:0,”12″:0,”15″:”ABeeZee”}”>संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेनेचं मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक आणि राज्यसभेचे खासदार आहेत. ते शिवसेनेच्या (Shivsena) वतीने महाराष्ट्रातून तीन वेळा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. ते २००४ पासून आजपर्यंत सलगपणे राज्यसभेचे सदस्य आहेत. २००५ पासून त्यांच्याकडे राज्यसभेतील शिवसेनेचे नेतेपदही देण्यात आलं. याशिवाय त्यांनी अनेक संसदीय समित्यांवर सदस्य म्हणूनही काम केलं आहे. संजय राऊत हे सुरुवातीच्या काळात मुंबईत पत्रकार म्हणून काम पाहत होते. पत्रकारीतेचं काम करत असतानाच त्यांची शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याशी परिचय झाला. त्यांच्यामुळेच ते राजकारणात आले आणि पुढे ते बाळासाहेबांच्या विश्वासातील नेते बनले. शिवसेनेत आल्यानंतर त्यांच्यावर सामना या मुखपत्रात महत्त्वाची जबाबदारी टाकण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सामनातील बहुचर्चित अग्रलेख आणि रोखठोक सदरं देखील संजय राऊत यांनी गाजवली. प्रसार माध्यमांमध्ये शिवसेनेची भूमिका प्रखरपणे मांडण्यासाठी ते ओळखले जातात. ते शिवसेनेचे प्रवक्ते देखील आहेत. राज्यात महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या स्थापनेतही त्यांचा मोलाचा वाटा आहे.
Read More