सारा अली खान Videos

सैफ अली खान व अमृता सिंग यांची लेक सारा अली खानने आज बॉलिवूडमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. २०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या केदारनाथ चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर लगेचच त्याच वर्षामध्ये तिचा सिंबा चित्रपटही प्रदर्शित झाला. साराचं काम पाहता ही अभिनेत्री लंबी रेस का घोडा आहे अशा चर्चा सुरू झाल्या. साराने ते सिद्धही केलं. लव्ह आज कल, कुली नंबर १, अतरंगी रे सारख्या चित्रपटांमध्ये तिने मुख्य भूमिका साकारल्या. नवीन वर्षातही तिच्या हाती बॉलिवूडचे काही बिग बजेट चित्रपट आहेत. Read More