सत्यपाल मलिक (Satyapal Malik) हे भारतीय राजकारणी आहेत. ते जम्मू-काश्मीर राज्याचे माजी राज्यपाल आहेत. २०१९ मध्ये त्याच्या कारकीर्दीमध्ये जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवण्यात आले होते. सत्यपाल मलिक यांचा जन्म २४ जुलै १९४६ रोजी उत्तर प्रदेशमध्ये जाट कुटुंबामध्ये झाला. विज्ञान शाखेमधून पदवी मिळवून त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. १९६८-६९ मध्ये विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. अशा प्रकारे त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली. १९८० मध्ये त्यांनी राज्यसभेची निवडणुक जिंकली.
१९८९ मध्ये जनता दलाकडून उमेदवारी मिळवून ते खासदार बनले. १९९६ साली ते पुन्हा लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहिले. पण यावेळी त्यांचा पराभव झाला. २०१२ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. २०१७ मध्ये ते बिहारचे राज्यपाल बनले. २०१८ मध्ये त्यांचा कार्यकाल संपला. पुढे २३ ऑगस्ट २०१८ ते ३० ऑक्टोबर २०१९ या काळात ते जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. त्यानंतर त्यांनी गोवा आणि मेघालय या राज्यांचे राज्यपालपद भूषवले.Read More
सत्यपाल मलिक यांच्याकडून सातत्याने मोदी सरकारला लक्ष्य करण्यात येत आहे. त्यामुळे सीबीआयची ही कारवाई राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात…
लैंगिक शोषणाविरोधात भारतीय कुस्तीगिरांच्या न्याय लढय़ाला राजकीय पािठबा वाढत असून जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन…
जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी पहिल्यांदाच भाष्य करताना मलिक यांच्या विश्वासार्हतेवर…
CBI summons Satyapal Malik जम्मू-काश्मीरमधील सरकारी कर्मचारी वैद्यकीय विमा योजना आणि किरू जलविद्युत कंत्राटात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मलिक यांनी केला…