Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

सायली संजीव Videos

सायली संजीव


सायली संजीव (Sayali Sanjiv) ही अभिनेत्री असून तिने मराठी मालिका (Marathi Serials) आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. सायलीचा जन्म ३१ जानेवारी रोजी १९९३ रोजी महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात झाला आहे. सायलीच्या नावातील संजीव हे आडनाव नसून तिच्या वडीलांचे नाव आहे. सायलीच्या वडिलांचे संजीव चांदसरकर आणि आईचे नाव शुंभागी आहे. सायली वडील हे तहलसीलदार होते. २०२१ मध्ये ३० नोव्हेंबरला तिच्या वडीलांचं निधन झालं. सायलीचे शालेय शिक्षण धुळ्यातील आरजेसी हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर नाशिकमधील एचपीटी आर्ट्स आणि आरवायके सायन्समधून तिने पदवीचे शिक्षण पूर्ण केले.


सायली कॉलेजमध्ये असताना सांस्कृतिक कार्यक्रम आणि मॉडेलिंगमध्ये सहभाग घेत असे. सायलीच्या करिअरची सुरुवात एका म्युझिक व्हिडीओमधून झाली होती. २०१४ मध्ये ‘आठवतो का तुला’ या म्युझिक व्हिडीओमध्ये सायलीने काम केले होते त्यानंतर झी मराठीवर प्रदर्शित झालेल्या ‘काहे दिया परदेस’ या मालिकेत तिने गौरीची भुमिका साकारली.


याशिवाय तिने शुभमंगल ऑनलाईन या मराठी मालिकेतही काम केले आहे. सायलीने पोलिस लाईन, आटपाटी नाईट्स, अलिबाग बायपास, बस्ता, दाह, गोष्ट एका पैठणीची आणि झिम्मा यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘गोष्ट एका पैठणी’ची या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे .काही दिवसांपूर्वी सायली संजीव आणि क्रिकेटर ऋतुराज गायकवाड यांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या होत्या ऋतुराज गायकवाडचे लग्न झाले त्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. सायलीला अभिनयाव्यक्तीरिक्त राजकारणातही रस आहे. सध्या सायली राज्यशास्त्र विषयात पदव्यूत्तर शिक्षण घेत आहे.


Read More