स्टेट बॅंक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय ही भारतातील सर्वात मोठ्या बॅंकापैकी एक बॅंक आहे. ब्रिटीश राजवटीमध्ये भारताचे बंगाल, मद्रास आणि बॉम्बे अशा तीन प्रांतांमध्ये विभाजन करण्यात आले होते. या तिन्हीही प्रांतांमध्ये ब्रिटीशांद्वारे ‘बॅंक ऑफ बंगाल’, ‘बॅंक ऑफ मद्रास’ आणि ‘बॅंक ऑफ बॉम्बे’ या बॅंकांची स्थापना करण्यात आली होती. पुढे १९२१ मध्ये या तिन्ही बॅंकांचे एकीकरण करुन ‘इंपीरियल बँक ऑफ इंडिया’ची स्थापना करण्यात आली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जुलै १९५५ मध्ये ‘इंपीरियल बँक ऑफ इंडिया’चे नाव बदलून ‘स्टेट बॅंक ऑफ इंडिया’ ठेवले गेले. शाखा आणि कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेतल्यास ही बॅंक जगातली सर्वात मोठी बॅंक ठरु शकते. या बॅंकेचे मुख्यालय मुंबई शहरामध्ये आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियातर्फ ग्राहकांना नानाविध प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातात. इतर देशांमध्येही या बॅंकेचे जाळे पसरले आहे. Read More
अमेरिकी मध्यवर्ती बँक ‘फेडरल रिझर्व्ह’कडून चार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पहिली व्याजदरकपात बुधवारी मध्यरात्री (भारतीय प्रमाण वेळेनुसार) अपेक्षित आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने सलग तिसऱ्या महिन्यात निधीआधारित कर्ज दर अर्थात एमसीएलआर संलग्न कर्जाच्या व्याजदरांमध्ये वाढ…