शफाली वर्मा (Shafali Verma) ही सध्याची आघाडीची महिला क्रिकेटपटू आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अंडर-१९ महिला टी२० विश्वचषकामध्ये (T20 World Cup) भारताने विजेतेपद मिळवले. या संघाची शफाली कर्णधार होती. तिचा जन्म २८ जानेवारी २००४ मध्ये हरियाणामधील (Haryana) रोहतक या ठिकाणी झाला. लहानपणापासून क्रिकेटची आवड असणाऱ्या शफालीने वयाच्या १५ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय सामने खेळायला सुरुवात केली. तिन्ही प्रकारामध्ये भारतातचे प्रतिनिधित्व करणारी ती सर्वात तरुण क्रिकेटपटू आहे. <br />
ती ८ ऑक्टोबर २०२२ रोजी आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये १००० धावा करणारी सर्वात तरुण खेळाडू बनली. महिला क्रिकेटपटूंच्या (Womens Cricketers) आंतरराष्ट्रीय टी२० स्पर्धांमध्ये खेळण्याचा तिला अनुभव आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स या संघाने सर्वाधिक बोली लावत शफालीला संघामध्ये घेतले.Read More
शफालीबाबत दिलेल्या निर्णयामुळे कॅप्टन लॅनिंग खूप निराश झाले. तिसऱ्या निर्णयानंतरही त्याने मैदानावरील पंचांशी बराच वेळ वाद घातला. शफालीला पॅव्हेलियनमध्ये परतावे…
Shafali Verma Emotional: टीम इंडियाने इंग्लंडला हरवून अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषक जिंकला. विजेतेपद पटकावल्यानंतर भारतीय संघाची कर्णधार शेफाली वर्मा भावूक…