
पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी (Shahid Afridi) १९९६ साली त्याने पाकिस्तानकडून (Pakistan) एकदिवसीय सामन्यामधून या क्षेत्रात पदार्पण केले. तब्बल १६ वर्षे तो पाकिस्तानकडून क्रिकेट खेळला. त्याची कारकीर्द ही बरीच वादग्रस्त राहिली. २००५ साली बॉल टेम्परिंग प्रकरणी त्याच्यावर दोन सामन्यांची बंदी घातली होती. भारत-पाकिस्तान (India Pakistan) सामन्यात त्याने भारताचा फलंदाज गौतम गंभीरशी पंगा घेतला होता. तो खूप चर्चेत राहिला. क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत तो पहिल्या पाचमध्ये आहे. त्याने एकहाती अनेक सामने पाकिस्तानसाठी जिंकून दिले आहेत. डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीचा तो सासरा आहे.