बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असलेला अभिनेता शाहरुख खान हा हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीचा विशिष्ट काळ गाजवणारा अभिनेता म्हणूनही त्याला ओळखले जाते. शाहरुखने १९८० च्या काळात फौजी, सर्कस या मालिकांमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. तर १९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या दीवाना या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. कोलकाता नाईट रायडर्स ही आयपीएलमधली टीम विकत घेत क्रिकेटच्या खेळातही संघाचा मालक म्हणून शाहरूखनं एंट्री केली व तिथंही तो यशस्वी झाला. भाराभर सिनेमे न करता मोजक्या चित्रपटांवर भर देण्याचा त्याचा प्रयत्न असतो.Read More
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “१५ मार्च २०२४ रोजी पनवेल येथे हत्यारं आल्यानंतर अनमोलने हल्लेखोरांना सलमानच्या घराबाहेर गोळीबार करण्यास सांगितले होते.”