शरद पवार

sharad pawar

शरद पवार हे भारतातील प्रमुख राजकारण्यांपैकी एक आहेत. शरद पवारांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी पुण्यातील बारामती तालुक्यात झाला. ५० वर्षांहून अधिक काळ संसदीय राजकारण करणारे नेते म्हणून शरद पवारांकडे पाहिले जाते. काँग्रेसपासून वेगळे होऊन त्यांनी १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) स्थापना केली. मात्र २०२३ साली झालेल्या पक्षातील फुटीनंतर आता त्यांच्या पक्षाचे नाव “राष्ट्रवादी कांग्रेस – शरदचंद्र पवार पक्ष”, असे आहे. तर मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचे पुतणे अजित पवार यांच्याकडे आहे.


शरद पवारांनी १९६० मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश घेत आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. १९६७ मध्ये ते पहिल्यांदा बारामतीमधून विधानसभेवर निवडून आले आणि १९७८ मध्ये महाराष्ट्राचे सर्वात कमी वयातील मुख्यमंत्री झाले. त्यांनी तीन वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले. १९८४ मध्ये ते लोकसभेवर निवडून गेले. केंद्रातही त्यांनी संरक्षण मंत्री, कृषी मंत्री अशी महत्त्वाची खाती सांभाळून त्यावर आपली छाप सोडली. राजकारणाबरोबरच शरद पवार यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) चे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.


आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप, अंडरवर्ल्ड संबंध याशिवाय अनेक वाद झाले. तरीही चाणाक्ष पुढाऱ्याप्रमाणे त्यांनी विविध पक्षांसह युती करुन आपले राजकीय अस्तित्व आजही अबाधित ठेवले आहे. २०१९ साली विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांना एकत्र आणत महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला. शरद पवारांच्या या खेळीमुळे १०६ आमदार असलेल्या भाजपाला अडीच वर्ष सत्तेपासून दूर राहावे लागले.


२०२३ मध्ये शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी बंड करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा घेतला. सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र विधिमंडळात अजित पवार हा दावा टिकवण्यात यशस्वी झाले. पक्ष फुटीनंतरही शरद पवार यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कडवी झुंज देत १० उमेदवारांपैकी ८ उमेदवार जिंकून आणण्यात यश मिळवले. तर दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाला एकच खासदार निवडून आणता आला. या निवडणुकीत शरद पवार यांच्यावर वैयक्तिक टीका झाली. ते नेतृत्व सोडत नसल्याचा आरोप अजित पवार आणि त्यांच्याबरोबरच्या नेत्यांनी केला. तरीही हे हल्ले पचवून शरद पवारांनी आपल्या पक्षाला यश मिळवून दिले.


Read More
sharad pawar Diwali padwa
पवार कुटुंबीयांचा बारामतीत वेगवेगळा पाडवा; शरद पवार गोविंदबागेत, अजित पवार काटेवाडीत नागरिकांच्या भेटीला प्रीमियम स्टोरी

बारामतीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतंत्रपणे पाडवा साजरा करणार असल्याचे निश्चित झाले आहे.

Sharad Pawar Baramati , Ajit Pawar Baramati ,
दिवाळीत बारामतीमध्ये फुटणार राजकीय फटाके, कारण दोन्ही पवार…!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विधानसभा निवडणुकीत शह देण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीत गाठीभेटींना सुरुवात केली आहे.

Mahavikas Aghadi campaign, Sharad Pawar,
‘मविआ’च्या प्रचाराला ‘या’ दिवशी होणार सुरुवात, मोठ्या नेत्याने दिली माहिती!

राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे…

ajit pawar, pawar family get together, diwali, baramati,
दिवाळीनिमित्त बारामतीत पवार कुटुंब एकत्र दिसणार का? या प्रश्नावर अजित पवारांचे दोन शब्दांत उत्तर…

दरम्यान दिवाळीनिमित्त पवार कुटुंब एकत्र येणार का या प्रश्नावर मोघम उत्तर अजित पवारांनी दिलं.

Sharad Pawar candidates Marathwada,
भाजप, शरद पवारांचे उमेदवार मराठवाड्यात सर्वत्र; काँग्रेस, अजित पवारांची पाटी काही जिल्ह्यांमध्ये कोरी

मराठवाड्यातील ४६ मतदारसंघांमध्ये महायुतीमध्ये भाजप २०, शिवसेना (एकनाथ शिंदे) १६ आणि अजित पवार नऊ मतदारसंघांत आणि राष्ट्रीय समाज पक्ष एक…

sharad pawar Dilip walse patil
Sharad Pawar : “…असं घडेल हे कधी वाटलं नव्हतं”, शरद पवारांची दिलीप वळसे-पाटलांवर टीका; म्हणाले, “सत्ता दिल्यावर त्यांनी…”

Sharad Pawar on Dilip Walse Patil : शरद पवार आंबेगावमध्ये बोलत होते.

Sharad Pawar
Sharad Pawar : “६ नोव्हेंबरपासून राहुल गांधी, मी आणि उद्धव ठाकरे..”, शरद पवारांचं वक्तव्य

शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. तसंच सिंचन घोटाळ्याच्या प्रश्नावर शरद पवारांनी बोलणं टाळलं आहे.

Sharad Pawar Meeting With NCP workers in baramati LIVE
Sharad Pawar Live: बारामतीत शरद पवारांचा कार्यकर्त्यांशी संवाद Live

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार हे बारामतीतून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. बारामतीत अजित पवार यांच्याविरोधात शरद पवार…

What Raj Thackeray Said About Shivsena NCP Split
Raj Thackeray : “उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे पक्ष फुटले, कारण..”, राज ठाकरेंनी नेमकं काय सांगितलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या निमित्ताने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली त्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे.

Ajit Pawar on Sharad Pawar Mimicry
Sharad Pawar Mimicry : शरद पवारांनी नक्कल केल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मुलाप्रमाणे असलेल्या…” फ्रीमियम स्टोरी

“शरद पवारांनी केलेली नक्कल मी पाहिली नाही. पण माझ्या कानावर आलं. नक्कल करणं त्यांचा अधिकार आहे”, असं अजित पवार म्हणाले.

devendra fadnavis reaction on harshwardhan patil about join ncp sharad pawar group
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: “आर. आर. आबा आता हयात नाहीत, पण एवढंच सांगतो की…”, देवेंद्र फडणवीसांचं अजित पवारांच्या दाव्यावर उत्तर!

Maharashtra Assembly Election 2024 Updates: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीशी संबंधित सर्व महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

संबंधित बातम्या