शरद पवार

sharad pawar

शरद पवार हे भारतातील प्रमुख राजकारण्यांपैकी एक आहेत. शरद पवारांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी पुण्यातील बारामती तालुक्यात झाला. ५० वर्षांहून अधिक काळ संसदीय राजकारण करणारे नेते म्हणून शरद पवारांकडे पाहिले जाते. काँग्रेसपासून वेगळे होऊन त्यांनी १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) स्थापना केली. मात्र २०२३ साली झालेल्या पक्षातील फुटीनंतर आता त्यांच्या पक्षाचे नाव “राष्ट्रवादी कांग्रेस – शरदचंद्र पवार पक्ष”, असे आहे. तर मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचे पुतणे अजित पवार यांच्याकडे आहे.


शरद पवारांनी १९६० मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश घेत आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. १९६७ मध्ये ते पहिल्यांदा बारामतीमधून विधानसभेवर निवडून आले आणि १९७८ मध्ये महाराष्ट्राचे सर्वात कमी वयातील मुख्यमंत्री झाले. त्यांनी तीन वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले. १९८४ मध्ये ते लोकसभेवर निवडून गेले. केंद्रातही त्यांनी संरक्षण मंत्री, कृषी मंत्री अशी महत्त्वाची खाती सांभाळून त्यावर आपली छाप सोडली. राजकारणाबरोबरच शरद पवार यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) चे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.


आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप, अंडरवर्ल्ड संबंध याशिवाय अनेक वाद झाले. तरीही चाणाक्ष पुढाऱ्याप्रमाणे त्यांनी विविध पक्षांसह युती करुन आपले राजकीय अस्तित्व आजही अबाधित ठेवले आहे. २०१९ साली विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांना एकत्र आणत महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला. शरद पवारांच्या या खेळीमुळे १०६ आमदार असलेल्या भाजपाला अडीच वर्ष सत्तेपासून दूर राहावे लागले.


२०२३ मध्ये शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी बंड करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा घेतला. सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र विधिमंडळात अजित पवार हा दावा टिकवण्यात यशस्वी झाले. पक्ष फुटीनंतरही शरद पवार यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कडवी झुंज देत १० उमेदवारांपैकी ८ उमेदवार जिंकून आणण्यात यश मिळवले. तर दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाला एकच खासदार निवडून आणता आला. या निवडणुकीत शरद पवार यांच्यावर वैयक्तिक टीका झाली. ते नेतृत्व सोडत नसल्याचा आरोप अजित पवार आणि त्यांच्याबरोबरच्या नेत्यांनी केला. तरीही हे हल्ले पचवून शरद पवारांनी आपल्या पक्षाला यश मिळवून दिले.


Read More
What Sharad Pawar Said About Chhagan Bhujbal ?
Sharad Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांना…”

शरद पवार यांना छगन भुजबळ यांच्या नाराजीबाबत विचारलं असता ते नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या.

Sanjay Shirsat on Sharad Pawar
Sharad Pawar : “जेव्हा ते शांत असतात तेव्हा समजून जायचं की…”; शरद पवारांबद्दल शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा

शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते संजय शिरसाट यांनी शरद पवार यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे.

Jitendra Awhad Post News
Chhagan Bhujbal : “शरद पवारांनी त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे…”; छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर आव्हाडांची खास पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छगन भुजबळ यांच्याबद्दल एक पोस्ट केली आहे.

Sharad Pawar NCP
Sharad Pawar NCP On Adani Issue : संसदेत अदाणींच्या मुद्द्यावर काँग्रेस एकाकी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही सोडला हात

Sharad Pawar NCP On Adani Issue | संसदेत काँग्रेसने अदाणींच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे.

Rupali Thombre Patil on Ajit Pawar
“अजित पवारांनी उद्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी युती केली तरी..”, रुपाली ठोंबरे पाटील यांचं अजब विधान

Rupali Thombre Patil: राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याबाबत रुपाली ठोंबरे पाटील यांनी भाष्य केले असून शरद पवार यांच्या गटातील…

Sunanda Pawar and Rohit Pawar
Sunanda Pawar : “माझी आई पवारांची मोठी सून…”, सुनंदा पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया!

मूठ घट्ट असेल तर त्याची ताकद वाढते, असं सुनंदा पवार म्हणाल्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगू लागी. दरम्यान, यावरून…

Ajit Pawar and Sharad Pawar
NCP Leader : “शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर आनंदच…”, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्याबाबत अंकुश काकडे यांचं वक्तव्य, काय म्हणाले अंकुश काकडे?

Sunanda Pawar: “मूठ घट्ट असेल तर त्याची ताकद…”, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याबाबत सुनंदा पवार यांचं मोठं विधान

Sunanda Pawar Statement: कुटुंब एकत्र असेल तर त्याची ताकद टिकून राहते, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित…

Shivsena UBT leader Sanjay Raut on NCP Sharad Pawar faction
Sanjay Raut : शरद पवार गटाचे पाच खासदार फोडून घेऊन या असं ‘यांना’ सांगितलंय- संजय राऊत

Sanjay Raut on NCP Sharad Pawar faction: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (दि. १२ डिसेंबर) शरद पवार यांची भेट घेऊन…

ajit pawar meet sharad pawar
अजितदादा सहकुटुंब पवारांच्या भेटीला, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नेत्यांची गर्दी

अजित पवारांबरोबर त्यांच्या पत्नी व राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, पुत्र पार्थ पवार यांनीही शरद…

Sunil Tatkare
Sunil Tatkare : “आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून…”; अमित शाह-शरद पवार भेटीनंतर सुनील तटकरेंची महत्त्वाची प्रतिक्रिया

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज शरद पवारांची भेट घेतली.

संबंधित बातम्या