शरद पवार Photos

sharad pawar

शरद पवार हे भारतातील प्रमुख राजकारण्यांपैकी एक आहेत. शरद पवारांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी पुण्यातील बारामती तालुक्यात झाला. ५० वर्षांहून अधिक काळ संसदीय राजकारण करणारे नेते म्हणून शरद पवारांकडे पाहिले जाते. काँग्रेसपासून वेगळे होऊन त्यांनी १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) स्थापना केली. मात्र २०२३ साली झालेल्या पक्षातील फुटीनंतर आता त्यांच्या पक्षाचे नाव “राष्ट्रवादी कांग्रेस – शरदचंद्र पवार पक्ष”, असे आहे. तर मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचे पुतणे अजित पवार यांच्याकडे आहे.


शरद पवारांनी १९६० मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश घेत आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. १९६७ मध्ये ते पहिल्यांदा बारामतीमधून विधानसभेवर निवडून आले आणि १९७८ मध्ये महाराष्ट्राचे सर्वात कमी वयातील मुख्यमंत्री झाले. त्यांनी तीन वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले. १९८४ मध्ये ते लोकसभेवर निवडून गेले. केंद्रातही त्यांनी संरक्षण मंत्री, कृषी मंत्री अशी महत्त्वाची खाती सांभाळून त्यावर आपली छाप सोडली. राजकारणाबरोबरच शरद पवार यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) चे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.


आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप, अंडरवर्ल्ड संबंध याशिवाय अनेक वाद झाले. तरीही चाणाक्ष पुढाऱ्याप्रमाणे त्यांनी विविध पक्षांसह युती करुन आपले राजकीय अस्तित्व आजही अबाधित ठेवले आहे. २०१९ साली विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांना एकत्र आणत महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला. शरद पवारांच्या या खेळीमुळे १०६ आमदार असलेल्या भाजपाला अडीच वर्ष सत्तेपासून दूर राहावे लागले.


२०२३ मध्ये शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी बंड करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा घेतला. सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र विधिमंडळात अजित पवार हा दावा टिकवण्यात यशस्वी झाले. पक्ष फुटीनंतरही शरद पवार यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कडवी झुंज देत १० उमेदवारांपैकी ८ उमेदवार जिंकून आणण्यात यश मिळवले. तर दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाला एकच खासदार निवडून आणता आला. या निवडणुकीत शरद पवार यांच्यावर वैयक्तिक टीका झाली. ते नेतृत्व सोडत नसल्याचा आरोप अजित पवार आणि त्यांच्याबरोबरच्या नेत्यांनी केला. तरीही हे हल्ले पचवून शरद पवारांनी आपल्या पक्षाला यश मिळवून दिले.


Read More
uddhav thackeray meets baba adhav, baba adhav protest sharad pawar ajit pawar uddhav thackeray meets Baba Adhav at pune
10 Photos
Photos : उद्धव ठाकरेंच्या हस्ते पाणी पिऊन बाबा आढाव यांनी सोडलं उपोषण; शरद पवार, अजित पवारांनी घेतली होती भेट

Baba Adhav Pune Protest Photos : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये झालेल्या ईव्हीएम घोटाळ्यावरून…

Rohit Patil Youngest Candidate maharashtra assembly election 2024
12 Photos
वडिलांनी २७ व्या वर्षी लढवलेली पहिली निवडणूक; आता मुलगाही २५ व्या वर्षी विधानसभेच्या मैदानात, कोण आहे महाराष्ट्रातील सर्वात तरुण उमेदवार?

यंदा तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात संजयकाका पाटील विरुद्ध रोहित पाटील अशी लढत पाहायला मिळणार आहे.

ajit pawar baramati election 2024
12 Photos
Baramati : बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, युगेंद्र पवार देणार काकांना लढत

Ajit Pawar Vs Yugendra Pawar : दरम्यान, बारामतीमध्ये यंदा काका पुतण्याची लढत पाहायला मिळणार आहे.

ajit pawar ncp candidates list
23 Photos
अजित पवारांनी यादीऐवजी वाटले थेट एबी फॉर्म, ‘हे’ १७ उमेदवार ठरले नशीबवान!

अजित पवारांनी वाटलेल्या एबी फॉर्मचे पहिले १७ मानकरी उमेदवार ठरले आहेत. कोण आहेत ते आणि त्यांचे मतदारसंघ जाणून घेऊयात.

12 Photos
विधानसभा निवडणुकीआधी ज्योती मेटेंच्या हाती ‘तुतारी’, कोण आहेत ‘शिवसंग्राम’च्या नेत्या?

Jyoti Mete Shivsangram : दरम्यान महायुतीने शिवसंग्रामला दिलेल्या शब्दांची पूर्तता झाली नाही तर आम्ही सन्मानजनक जागा देतील त्यांच्यासोबत जाणार, असे…

raj thackeray vs devendra fadanvis on ladki bahin yojna
12 Photos
लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरेंची टीका; “पुढील पाच वर्षे…”, देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युत्तर

Ladki Bahin Yojana, Mahayuti Sarkar, Raj Thackeray, devendra Fadanvis : दरम्यान काल (१३ ऑक्टोबर) कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात संबोधित करताना महाराष्ट्र नवनिर्माण…

Sharad Pawar lalbaugcha Raja Darshan
9 Photos
Sharad Pawar: शरद पवार ‘लालबाग राजा’चरणी नतमस्तक! म्हणाले, “बळीराजाच्या आणि जनसामान्यांच्या…”

Sharad Pawar lalbaugcha Raja Darshan : आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे.

political leaders ganesh chaturthi wishes
12 Photos
Ganesh Chaturthi 2024: पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह ‘या’ नेत्यांनी दिल्या जनतेला शुभेच्छा, पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे केले आवाहन

Ganeshostav 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशिवाय अनेक राजकीय नेत्यांनी देशवासियांना गणेश चतुर्थीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

sharad pawar on cm formula maharashtra
10 Photos
Sharad Pawar On Cm Formula : मुख्यमंत्री पदाबाबत शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “१९७७ च्या विधानसभा निवडणुकीवेळी…”

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री निवडीवरून महाविकास आघाडी अंतर्गत मतमतांतरे दिसत आहेत. 

mva melava 2024
11 Photos
“मोदी शाहांच्या हाती महाराष्ट्र देऊ नका”, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे आवाहन, सद्भावना मेळाव्यात ठाकरे- पवार काय म्हणाले?

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त षण्मुखानंद सभागृहात काँग्रेसने आयोजित केलेल्या सद्भावना मेळाव्यात खरगे यांनी भाजपवर टीका केली.

Mahavikas Aghadi Melava Mumbai
12 Photos
महाविकास आघाडीने फुंकले विधानसभा निवडणूक प्रचाराचे रणशिंग; उद्धव ठाकरे-शरद पवार भाषणात काय म्हणाले?

‘मविआ’चे दूत म्हणून गावागावात जा आणि आपल्या कामाचा प्रचार करा. वज्रमूठ शब्दात नको, ती प्रत्यक्षात हवी. उमेदवारी मिळाली नाही तरी…

Sharad Pawars empire, Net Worth, Property and Investmen
10 Photos
PHOTOS : मविआचे बडे नेते शरद पवार यांची संपत्ती किती? ‘इथे’ केलीय सर्वाधिक गुंतवणूक, वाचा मालमत्तेची माहिती

Sharad Pawar s empire, Net Worth, Property and Investment : शरद पवार महाराष्ट्रासह देशातील एक बडे दिग्गज राजकीय नेते आहेत.…

ताज्या बातम्या