शरद पवार Videos

sharad pawar

शरद पवार हे भारतातील प्रमुख राजकारण्यांपैकी एक आहेत. शरद पवारांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी पुण्यातील बारामती तालुक्यात झाला. ५० वर्षांहून अधिक काळ संसदीय राजकारण करणारे नेते म्हणून शरद पवारांकडे पाहिले जाते. काँग्रेसपासून वेगळे होऊन त्यांनी १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) स्थापना केली. मात्र २०२३ साली झालेल्या पक्षातील फुटीनंतर आता त्यांच्या पक्षाचे नाव “राष्ट्रवादी कांग्रेस – शरदचंद्र पवार पक्ष”, असे आहे. तर मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचे पुतणे अजित पवार यांच्याकडे आहे.


शरद पवारांनी १९६० मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश घेत आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. १९६७ मध्ये ते पहिल्यांदा बारामतीमधून विधानसभेवर निवडून आले आणि १९७८ मध्ये महाराष्ट्राचे सर्वात कमी वयातील मुख्यमंत्री झाले. त्यांनी तीन वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले. १९८४ मध्ये ते लोकसभेवर निवडून गेले. केंद्रातही त्यांनी संरक्षण मंत्री, कृषी मंत्री अशी महत्त्वाची खाती सांभाळून त्यावर आपली छाप सोडली. राजकारणाबरोबरच शरद पवार यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) चे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.


आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप, अंडरवर्ल्ड संबंध याशिवाय अनेक वाद झाले. तरीही चाणाक्ष पुढाऱ्याप्रमाणे त्यांनी विविध पक्षांसह युती करुन आपले राजकीय अस्तित्व आजही अबाधित ठेवले आहे. २०१९ साली विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांना एकत्र आणत महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला. शरद पवारांच्या या खेळीमुळे १०६ आमदार असलेल्या भाजपाला अडीच वर्ष सत्तेपासून दूर राहावे लागले.


२०२३ मध्ये शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी बंड करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा घेतला. सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र विधिमंडळात अजित पवार हा दावा टिकवण्यात यशस्वी झाले. पक्ष फुटीनंतरही शरद पवार यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कडवी झुंज देत १० उमेदवारांपैकी ८ उमेदवार जिंकून आणण्यात यश मिळवले. तर दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाला एकच खासदार निवडून आणता आला. या निवडणुकीत शरद पवार यांच्यावर वैयक्तिक टीका झाली. ते नेतृत्व सोडत नसल्याचा आरोप अजित पवार आणि त्यांच्याबरोबरच्या नेत्यांनी केला. तरीही हे हल्ले पचवून शरद पवारांनी आपल्या पक्षाला यश मिळवून दिले.


Read More
Deputy Chief Minister Ajit Pawar Wife MP Sunetra Pawar Gets Second Class Bunglow
Ajit Pawar: अजित दादांची ‘पॉवर’ वाढली! सुनेत्रा पवारांना सासऱ्यांच्या समोरचा बंगला

Ajit Pawar Wife MP Sunetra Pawar Gets Second Class Bunglow: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या खासदार सुनेत्रा पवार यांना दिल्लीतील…

Deputy Chief Minister Eknath Shinde gave a birthday wishes to Sharad Pawar
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! | एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! | एकनाथ शिंदे

Chief Minister Devendra Fadnavis wishes Sharad Pawar a happy birthday
“राज्याची आणि देशाची सेवा…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

“राज्याची आणि देशाची सेवा…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा | Devendra Fadnavis

Deputy Chief Minister Ajit Pawars first reaction after Sharad Pawars meeting in Delhi
Ajit Pawar on Sharad Pawar: दिल्लीत शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज ८५ वा वाढदिवस. यानिमित्ताने उपमुख्यममंत्री अजित पवार यांनी पक्षातील नेते…

Ajit Pawar met Sharad Pawar in Delhi and wished him a happy birthday
Ajit Pawar Meet Sharad Pawar:अजित पवार यांनी दिल्लीत शरद पवारांना भेटून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज ८५ वा वाढदिवस. यानिमित्ताने उपमुख्यममंत्री अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा…

sanjay raut criticized devendra fadanvis and bjp government over maharashtra politics
Sanjay Raut: “शरद पवारांविषयी अशी भाषा आणि धमक्या;राऊतांचा फडणवीसांना सवाल

मारकडवाडीमध्ये भाजपा आमदार गोपिचंद पडळकर आणि राम सातपुते यांची सभा पार पडली. यावेळी शरद पवारांवर केलेल्या जहरी टीकेवरून ठाकरे गटाचे…

BJP state president Chandrashekhar Bawankule has criticized Sharad Pawar
Chandrashekhar Bawankule:”जेव्हा पराभव स्वीकारता येत नाही तेव्हा…”;बावनकुळेंची शरद पवारांवर टीका

Chandrashekhar Bawankule: शरद पवार (Sharad Pawar) यांनी मतांची संख्या सांगत आम्हाला मतं जास्त मिळाली तरी जागा कशा काय कमी आल्या?…

ताज्या बातम्या