शार्दुल ठाकूर

शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) हा भारतीय क्रिकेटपटू आहे. तो उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करतो. त्यासह शेवटच्या फळीमध्ये फलंदाजी करण्याचा अनुभवही शार्दुलकडे आहे. अंगी असलेल्या कौशल्यामुळे त्याला लॉर्ड हे टोपननाव पडले आहे. शार्दुलचा जन्म १६ ऑक्टोबर १९९१ रोजी महाराष्ट्रातील पालघरमध्ये झाला. शालेय जीवनामध्येच त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. क्रिकेटचे प्रशिक्षण घेण्यासाठी तो पालघरवरुन दक्षिण मुंबईला लोकलने प्रवास करत यायचा. मेहनत आणि चिकाटी या गुणांमुळे त्याचा खेळ दिवसेनदिवस चांगला होत गेला.


कमी उंची आणि जास्तीचे वजन या गोष्टींमुळे सुरुवातीच्या काळात शार्दुलवर टीका केली जात असे. असे असतानाही त्याने मुंबईच्या संघात स्थान पटकावले. २०१२-१३ च्या रणजी स्पर्धेमध्ये त्याने मुंबईकडून खेळत पदार्पण केले. २०१३-१४ च्या रणजी ट्रॉफीमध्ये त्याने सहा सामन्यांमध्ये २६.२५ च्या सरासरीने २७ गडी बाद केले. पुढच्या हंगामामध्ये त्याने दहा रणजी सामन्यांमध्ये २०.८१ च्या सरासरीने ४८ गडी बाद केले. तेव्हा शार्दुलने ५ सामन्यांमध्ये ५ गडी बाद करण्याचा विक्रम देखील केला. पुढे त्याला रणजी, विजय हजारे ट्रॉफीसह अन्य स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. २०१५-१६ मध्ये रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये शार्दुलने सौराष्ट्र संघाच्या आठ फलंदाजांना बाद करत मुंबईला जेतेपद मिळवून दिले.


२०१५ च्या आयपीएल (IPL) हंगामामध्ये त्याच्यावर किंग्स इलेवन पंजाब या संघाने बोली लावली. २०१५ आणि २०१६ या दोन वर्षांमध्ये तो पंजाबकडून खेळला. पुढे २०१७ मध्ये राइजिंग पुणे सुपरजायंट्समध्ये शार्दुल ठाकूर सामील झाला. या काळात त्याचा खेळ आणखी चांगला होत गेला. तो ऑल-राऊंडर म्हणून देखील नावारुपाला आला. पुणे नंतर त्याला चेन्नईच्या संघातून खेळण्याची संधी मिळाली. ३ वर्ष सीएसकेकडून खेळल्यानंतर लिलावामध्ये त्याच्यावर दिल्ली संघाकडून बोली लावण्यात आली. २०२३ पासून तो कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग आहे.


शार्दुलने ऑगस्ट २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. पुढे फेब्रुवारी २०१८ मध्ये त्याने टी-२० मध्येही पदार्पण केले. त्याच वर्षी ऑक्टोबर २०१८ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धचा त्याचा पहिला कसोटी सामना होता. एकूण आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमध्ये त्याने ८ कसोटी सामन्यांमध्ये २५४ धावा केल्या आहेत, तर २९ गडी बाद केले आहेत; ३५ एकदिवसीय सामन्यांमध्ये २९८ धावा केल्या आहेत, तर ५० गडी बाद केले आहेत; २५ टी-२० सामन्यांमध्ये ६९ धावा केल्या आहेत, तर ३३ फलंदाजांना बाद केले आहे. आगामी आशिया कप २०२३ च्या भारतीय संघामध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. शार्दुल ठाकूरला विश्वचषक स्पर्धेमध्ये संधी मिळू शकतो असे म्हटले जात आहे.



Read More
Shardul Thakur Revealed How He Comeback in IPL 2025 After Being Unsold in Auction Said Zaheer Khan calls me
SRH vs LSG: “मला झहीर खानचा कॉल आला अन्…”, शार्दुल ठाकूरची IPL 2025 मध्ये अशी झाली एन्ट्री, सामन्यानंतर स्वत सांगितलं नेमकं काय घडलं?

Shardul Thakur SRH vs LSG: आयपीएल २०२५ च्या सीझनमध्ये अनसोल्ड राहिलेल्या शार्दुल ठाकूरने बदली खेळाडू म्हणून येत भेदक गोलंदाजी केली.…

Shardul Thakur Purple Cap of IPL 2025 after Taking 4 Wickets in SRH vs LSG Match Completes 100 wickets
SRH vs LSG: लॉर्ड शार्दुल ठाकूर! IPL लिलावात अनसोल्ड राहिलेल्या शार्दुलचा कहर, बदली खेळाडू म्हणून आला अन् ठरला नंबर वन गोलंदाज

Shardul Thakur Bowling: शार्दुल ठाकूरने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध भेदक गोलंदाजी करत ४ षटकांत ३४ धावा देत ४ विकेट घेतले. यासह, तो…

Ranji Trophy Mumbai Beat Haryana by 153 And Enters Semi final
Ranji Trophy: चॅम्पियन मुंबई संघाची रणजीच्या सेमीफायनलमध्ये धडक, अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर ठरले विजयाचे हिरो

Ranji Trophy: रणजी ट्रॉफीने उपांत्यपूर्वी फेरीत हरियाणाचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

Shardul Thakur 6 Wickets Haul in Ranji Trophy Quarter Final Mumbai vs Haryana
Ranji Trophy: लॉर्ड शार्दुल ठाकूर पुन्हा एकदा चमकला! रणजी उपांत्यपूर्व फेरीत एकट्यानं निम्मा संघ केला बाद, मुंबई मजबूत स्थितीत

Ranji Trophy Quarterfinals: शार्दुल ठाकूरने रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत हरियाणाविरुद्ध शानदार गोलंदाजी करत ६ विकेट घेतल्या. त्याच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर…

Ranji Trophy Quarterfinal Mumbai Squad Announced Suryakumar Yadav Shivam Dube to play vs Haryana
Ranji Trophy: रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीसाठी मुंबईच्या संघात मोठे बदल, टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूंना दिली संधी; कसा आहे संघ?

Ranji Trophy Mumbai Quarter Final Squad: रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यासाठी मुंबईचा संघ जाहीर करण्यात आला आहे. सलामीवीर पृथ्वी शॉ…

Shardul Thakur take hat trick against Meghalaya for Mumba in Ranji Trophy 2025 match
Ranji Trophy 2025 : शार्दुल ठाकुरच्या भेदक गोलंदाजीसमोर मेघालयने टेकले गुडघे! नोंदवला रणजी ट्रॉफी इतिहासातील लाजिरवाणा विक्रम

Ranji Trophy 2025 Shardul Thakur : मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने गुरुवारी मेघालयविरुद्ध हॅट्ट्रिक साधून कहर केला. ही त्याची फर्स्ट…

Ranji Trophy 2025 Shardul Thakur scored a century for Mumbai against Jammu and Kashmir
Ranji Trophy 2025 : शार्दुल ठाकूरचं दमदार शतक… पुन्हा एकदा मुंबईला तारलं

Ranji Trophy 2025 Shardul Thakur छ शार्दुल ठाकूरने मुंबईसाठी अप्रतिम कामगिरी केली . त्याने शतक झळकावून संघाला तारले. रोहित आणि…

If someone has quality he should be given more chances Shardul Thakur says selection committee after ranji trophy match
Ranji Trophy : “कोणाकडे गुणवत्ता असेल तर त्याला अधिक…”, टीम इंडियातून दुर्लक्ष केल्याने शार्दुल ठाकूरची संतप्त प्रतिक्रिया

Ranji Trophy Updates : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय कसोटी संघात स्थान न मिळालेल्या ठाकूरने सांगितले की, खेळाडूंमध्ये ‘गुणवत्ता’ असेल तर…

Indian Players Ranji Trophy 2025
Ranji Trophy: रणजी सामन्यांना ग्लॅमर; टीम इंडियाच्या शिलेदारांचा घाऊक सहभाग

Ranji Trophy 2025: सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी सामन्यांमध्ये भारतीय संघातील कोणकोणते खेळाडू खेळत आहेत, जाणून घ्या.

Vijay Hazare Trophy Mumbai Beat Arunachal Pradesh by 9 Wickets Under Shardul Thakur Captaincy
Vijay Hazare Trophy: शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईने उडवला अरुणाचलचा धुव्वा; अवघ्या ३३ चेंडूत जिंकला सामना

Vijay Hazare Trophy 2024-25: विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईच्या संघाने अजून एक जबरदस्त विजय मिळवला आहे. श्रेयस अय्यरच्या जागी शार्दुल ठाकूर…

Mumbai beat Services team on the strength of Suryakumar Yadav and Shivam Dube prithvi shaw duck against Services
SMAT 2024 : मुंबईच्या विजयात सूर्या-शिवम आणि शार्दुल चमकले, तर पृथ्वी शॉने पुन्हा केले निराश

SMAT 2024 Updates : पृथ्वी शॉ पुन्हा एकदा फलंदाजीत फ्लॉप ठरला आहे. त्याने तीन चेंडूंचा सामना केला, पण त्याला खातेही…

IPL 2025 Mega Auction Veteran players remained unsold list
IPL 2025 Unsold Players List : डेव्हिड वॉर्नर, केन विल्यम्सन आणि शार्दुल ठाकुरसारखे दिग्गज खेळाडू राहिले अनसोल्ड, पाहा यादी

IPL 2025 Unsold Players : आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावासाठी एकूण ५७७ खेळाडूंची नावे निश्चित करण्यात आली. मात्र, लिलावात यापैकी…

संबंधित बातम्या