शार्दुल ठाकूर News

शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) हा भारतीय क्रिकेटपटू आहे. तो उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करतो. त्यासह शेवटच्या फळीमध्ये फलंदाजी करण्याचा अनुभवही शार्दुलकडे आहे. अंगी असलेल्या कौशल्यामुळे त्याला लॉर्ड हे टोपननाव पडले आहे. शार्दुलचा जन्म १६ ऑक्टोबर १९९१ रोजी महाराष्ट्रातील पालघरमध्ये झाला. शालेय जीवनामध्येच त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. क्रिकेटचे प्रशिक्षण घेण्यासाठी तो पालघरवरुन दक्षिण मुंबईला लोकलने प्रवास करत यायचा. मेहनत आणि चिकाटी या गुणांमुळे त्याचा खेळ दिवसेनदिवस चांगला होत गेला.


कमी उंची आणि जास्तीचे वजन या गोष्टींमुळे सुरुवातीच्या काळात शार्दुलवर टीका केली जात असे. असे असतानाही त्याने मुंबईच्या संघात स्थान पटकावले. २०१२-१३ च्या रणजी स्पर्धेमध्ये त्याने मुंबईकडून खेळत पदार्पण केले. २०१३-१४ च्या रणजी ट्रॉफीमध्ये त्याने सहा सामन्यांमध्ये २६.२५ च्या सरासरीने २७ गडी बाद केले. पुढच्या हंगामामध्ये त्याने दहा रणजी सामन्यांमध्ये २०.८१ च्या सरासरीने ४८ गडी बाद केले. तेव्हा शार्दुलने ५ सामन्यांमध्ये ५ गडी बाद करण्याचा विक्रम देखील केला. पुढे त्याला रणजी, विजय हजारे ट्रॉफीसह अन्य स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. २०१५-१६ मध्ये रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये शार्दुलने सौराष्ट्र संघाच्या आठ फलंदाजांना बाद करत मुंबईला जेतेपद मिळवून दिले.


२०१५ च्या आयपीएल (IPL) हंगामामध्ये त्याच्यावर किंग्स इलेवन पंजाब या संघाने बोली लावली. २०१५ आणि २०१६ या दोन वर्षांमध्ये तो पंजाबकडून खेळला. पुढे २०१७ मध्ये राइजिंग पुणे सुपरजायंट्समध्ये शार्दुल ठाकूर सामील झाला. या काळात त्याचा खेळ आणखी चांगला होत गेला. तो ऑल-राऊंडर म्हणून देखील नावारुपाला आला. पुणे नंतर त्याला चेन्नईच्या संघातून खेळण्याची संधी मिळाली. ३ वर्ष सीएसकेकडून खेळल्यानंतर लिलावामध्ये त्याच्यावर दिल्ली संघाकडून बोली लावण्यात आली. २०२३ पासून तो कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग आहे.


शार्दुलने ऑगस्ट २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. पुढे फेब्रुवारी २०१८ मध्ये त्याने टी-२० मध्येही पदार्पण केले. त्याच वर्षी ऑक्टोबर २०१८ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धचा त्याचा पहिला कसोटी सामना होता. एकूण आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमध्ये त्याने ८ कसोटी सामन्यांमध्ये २५४ धावा केल्या आहेत, तर २९ गडी बाद केले आहेत; ३५ एकदिवसीय सामन्यांमध्ये २९८ धावा केल्या आहेत, तर ५० गडी बाद केले आहेत; २५ टी-२० सामन्यांमध्ये ६९ धावा केल्या आहेत, तर ३३ फलंदाजांना बाद केले आहे. आगामी आशिया कप २०२३ च्या भारतीय संघामध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. शार्दुल ठाकूरला विश्वचषक स्पर्धेमध्ये संधी मिळू शकतो असे म्हटले जात आहे.



Read More
Ranji Trophy Cricket All rounder Shardul Thakur reacts ahead of match against Baroda vs Maharashtra sports news
बडोद्याविरुद्धच्या पराभवातून धडा, आता विजयी पुनरागमनाचे ध्येय!महाराष्ट्रविरुद्धच्या सामन्यापूर्वी अष्टपैलू शार्दूल ठाकूरची प्रतिक्रिया

सलामीच्या लढतीत बडोद्याविरुद्धचा पराभव आमच्यासाठी अनपेक्षित होता. मात्र, आम्ही त्यातून धडा घेतला असून महाराष्ट्राविरुद्धच्या लढतीत आमचे विजयी पुनरागमनाचे ध्येय आहे,…

Meet wife of famous Indian cricketer who cracked CS exam, now earns crores by selling cakes her net worth is snk 94
CS परीक्षा उत्तीर्ण आहे “या’ प्रसिद्ध भारतीय क्रिकेटरची पत्नी! आता केक विकून कमावते कोटींमध्ये नफा, कोण आहे ती?

काही भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नींनी त्यांच्या पतीच्या प्रसिद्धीशिवाय स्वतःचे नाव कमावले आहे.

Shardul Thakur High Fever Taken To Hospital After Ninth Wicket Stand with Sarfaraz Khan Read Health Update Irani Cup
Irani Cup: अंगात १०२ डिग्री ताप असतानाही शार्दूल ठाकूरने केली शानदार फलंदाजी; बाद होताच थेट रुग्णालयात

Irani Cup 2024: शार्दुल ठाकूर अंगात १०२ डिग्री ताप असतानाही ५९ चेंडू खेळला आणि नंतर त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले…

Shardul Thakur Foot Surgery
Team India : भारतीय संघाच्या स्टार खेळाडूवर लंडनमध्ये शस्त्रक्रिया, ‘इतके’ महिने क्रिकेटच्या मैदानापासून राहणार दूर

Team India : टी-२० विश्वचषक २०२४ दरम्यान, टीम इंडियाच्या एका स्टार खेळाडूशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. या खेळाडूच्या…

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: पथिरानाखेरीज तुषार देशपांडे, शार्दुल ठाकूरची २ षटके ठरली सामन्याचा टर्निंग पॉइंट; वाचा सविस्तर

IPL 2024 MI vs CSK: वानखेडेवर झालेल्या सामन्यात चेन्नईने मुंबईचा २० धवांनी पराभव केला. मथीशा पथिरानाच्या ४ विकेटशिवाय २ षटके…

Ranji Trophy 2024 2nd Semi Final Mumbai vs Tamil Nadu Updates
Ranji Trophy 2024 : शार्दुल ठाकूरची कमाल! वनडे स्टाइलने झळकावले प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले शतक

Shardul Thakur scored a century : टीम इंडियाचा अष्टपैलू शार्दुल ठाकूरने रणजी ट्रॉफीच्या सेमीफायनल मॅचमध्ये अप्रतिम खेळी केली. त्याने तामिळनाडूविरुद्ध…

mumbai vs assam ranji trophy match shardul's 6 wickets
शार्दुल ठाकूरचे शानदार पुनरागमन! अवघ्या २१ धावात ६ विकेट्स घेत प्रतिस्पर्धी संघाचा डाव लंच ब्रेकपूर्वीच गुंडाळला

Ranji Trophy 2025 Updates : वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून टीम इंडियातून बाहेर आहे. आता त्याने आसामविरुद्धच्या रणजी…

IND vs SA 2nd Test Updates in marathi
IND vs SA : केपटाऊन कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, सराव सत्रात ‘या’ खेळाडूला फलंदाजी करताना झाली दुखापत

Shardul Thakur Injury : केपटाऊनमधील दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी नेट सत्रात फलंदाजी करताना शार्दुल ठाकूरच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली. दुखापतीची तीव्रता…

Ravi Shastri Slams Shardul Thakur After India's humiliating defeat against south africa
IND vs SA Test : ‘तो लहान मुलगा नाही…’, भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर शार्दुल ठाकुरवर संतापले रवी शास्त्री

Ravi Shastri Slams Shardul Thakur : शार्दुल ठाकूरला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत केवळ एकच विकेट घेता आली आणि भारताचा एका…

Year Ender 2023 Indian Cricketer Marriage
सरत्या वर्षात भारतीय क्रिकेट विश्वातील के. एल. राहुल, ऋतुराज गायकवाडसह ‘हे’ सात खेळाडू अडकले लग्नबंधनात

या वर्षी क्रिकेट विश्वात लग्न झालेल्या सात खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहेत.

IND vs BAN Playing 11: Ashwin did not get a chance Team India entered without change know the playing 11 of both the teams
IND vs BAN: आर. अश्विन ऐवजी शार्दुल ठाकूरला संधी दिल्याने टीम इंडियाला बसणार का फटका? जाणून घ्या

India vs Bangladesh, World Cup: टीम इंडियाने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात कुठलाही बदल न केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. फिरकीला मदत…

IND vs AFG, ICC World Cup 2023 Match Updates
IND vs AFG: विराट कोहलीकडून हिरावले सुवर्णपदक! शानदार कामगिरीच्या जोरावर ‘या’ खेळाडूने पटकावले पदक, पाहा VIDEO

IND vs AFG, ICC World Cup 2023: विराट कोहलीने सलग दोन सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावली. मात्र अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर त्याचे सुवर्णपदक दुसऱ्या…