शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) News

शिवसेना उद्धव ठाकरे गटाची (Shivsena Udhhav Thackeray) स्थापना २०२३ साली झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)यांचे चिरंजीव तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या गटाचे प्रमुख आहेत. २०२३ मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी केली होती. विधान परिषद निवडणुकीची मतमोजनी सुरू असताना एकनाथ शिंदे यांनी १६ आमदारांसह सुरत गाठले. शिवसेना पक्षाशी बंडखोरी करत शिंदे यांनी बहुसंख्य शिवसेना आमदारांसह भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली. राज्यात उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट असे दोन गट उदयास आले.


एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षावर आणि चिन्हावरदेखील दावा केला होता. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नाव बदलले आणि पक्षाचे चिन्हदेखील बदलले. पक्षाला मशाल हे चिन्ह मिळाले.


शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीत सहभागी होत विरोधकाची भूमिका बजावत आहे. असली नकली शिवसेनेवरून दोन्ही गटांमध्ये जोरदार खटके उडाले. निवडणुकीत बघून घेण्याची भाषा झाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही गटांची ताकद स्पष्ट झाली. महाविकास आघाडीने ४८ पैकी ३० जागा मिळवत राज्यात दणदणीत विजय मिळवला. तर महायुतीला १७ जागांवरच विजय मिळवता आला. या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने २१ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी ९ जागा त्यांनी जिंकल्या. तर एकनाथ शिंदे यांना १५ जागा मिळाल्या होत्या त्यापैकी त्यांना ७ जागा जिंकण्यात यश आले.


निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा स्ट्राईक रेट हा ठाकरे गटापेक्षा अधिक होता. मात्र निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला मिळालेली एकूण मते ही शिंदे गटापेक्षा अधिक आहेत. मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने ४ जागा लढवल्या होत्या त्यापैकी तीन जागा त्यांनी जिंकल्या तर वायव्य मुंबईची जागा त्यांनी ४८ मतांनी गमावली. यातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मुंबईत वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले. लोकसभा पाठोपाठ उद्धव ठाकरे गटाने मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातही विजय मिळवला.


Read More
Defense Minister, Chief Minister in the Chhatrapati Sambhajinagar city today, Thackeray group agitation
संरक्षण मंत्री, मुख्यमंत्री आज शहरात, ठाकरे गटाच्या वतीने शहरातील चौकात कोरड्या घागरीचे तोरण

शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने शहरातील विविध चौकात कोरड्या घागरी बांधून आंदोलन करण्याचे ठरविले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला…

uddhav Thackeray shiv sena group workers gained party meeting nashik
ठाकरे गटाच्या निर्धार शिबिराने कार्यकर्त्यांना काय दिले ?

नेहमीचा हिंदुत्वाचा मार्ग न सोडता कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुका जिंकण्यासाठी बूथस्तरापासून यंत्रणा कशी कार्यरत करावी लागेल, याचा धडा देण्यात…

nashik, nagpur riots politics between state government opposition parties congress uddhav thackeray shiv sena
नाशिकला जे घडले, तेच नागपूरलाही ! महायुतीला विरोधकांची धास्ती ?

२०१४ ते २०२५ या काळात अडीच वर्षाचा अपवाद सोडला तर सत्ताधाऱ्यांनी कायम विरोधी पक्षाची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते.

What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची जोरदार टीका, “भाजपा हिंदुत्ववादी पक्ष आहे हेच मोठं फेक नरेटिव्ह, यांनी…”

नाशिक येथील कार्यकर्ता शिबीरात उद्धव ठाकरे यांनी घणाघाती भाषण केलं. या भाषणात त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली.

Chandrashekhar Bawankule criticizes uddhav thackeray on using Balasaheb voice
बावनकुळेंची उध्दव ठाकरेंवर टीका, म्हणाले “आज बाळासाहेब ठाकरे असते तर लाथच मारली असती “

आपला आवाज कुणी ऐकत नाही, म्हणून आपले विचार हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात ऐकवण्याचा पोरकटपणा फक्त आणि फक्त…

nashik shiv sena ubt nirdhar camp at govind Nagar
कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसाठी सर्वकाही, ठाकरे गटाच्या निर्धार शिबिरातील वातावरण

उन्हाचा तडाखा दिवसागणिक वाढत असतांना तळपत्या उन्हात गर्दी जमविण्याचे आव्हान शिवसेनेच्या (उध्दव ठाकरे) वतीने पेलण्यात आल्याचे गोविंद नगरातील मनोहर गार्डनमध्ये…

shiv sena thackeray faction protested against central governments hike in price of Prime ministers ujjwala gas scheme
पिंपरी: उज्वला गॅस योजनेच्या दरवाढी विरोधात ठाकरे गटाचे आंदोलन; मोदींच्या विरोधात घोषणाबाजी, चुलीवर भाकरी थापून केला अनोखा निषेध

पंतप्रधानांच्या उज्वला गॅस योजनेत केंद्र सरकार ने ५० रुपयांनी दरवाढ केल्याने शिवसेना ठाकरे गटाकडून निषेध करण्यात आला आहे.

Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party workers hold a bike rally in Nashik city
शिबिरातून पक्ष पुनर्बांधणीचा उद्देश; कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याची ठाकरे गटाची तयारी

लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय आणि विधानसभा निवडणुकीत मात्र दारूण पराभव या विरोधी निकालानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे बुधवारी आयोजित…

Kolhapur former mla of uddhav thackeray faction sanjay ghatge joined bjp on tuesday
माजी आमदार संजय घाटगे यांचा भाजपात प्रवेश; ठाकरे गटाला धक्का

उध्दव ठाकरे गटाचे माजी आमदार संजय घाटगे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करीत मंगळवारी भाजपात प्रवेश केला. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात ठाकरे…

ताज्या बातम्या