शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) Videos

शिवसेना उद्धव ठाकरे गटाची (Shivsena Udhhav Thackeray) स्थापना २०२३ साली झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)यांचे चिरंजीव तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या गटाचे प्रमुख आहेत. २०२३ मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी केली होती. विधान परिषद निवडणुकीची मतमोजनी सुरू असताना एकनाथ शिंदे यांनी १६ आमदारांसह सुरत गाठले. शिवसेना पक्षाशी बंडखोरी करत शिंदे यांनी बहुसंख्य शिवसेना आमदारांसह भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली. राज्यात उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट असे दोन गट उदयास आले.


एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षावर आणि चिन्हावरदेखील दावा केला होता. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नाव बदलले आणि पक्षाचे चिन्हदेखील बदलले. पक्षाला मशाल हे चिन्ह मिळाले.


शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीत सहभागी होत विरोधकाची भूमिका बजावत आहे. असली नकली शिवसेनेवरून दोन्ही गटांमध्ये जोरदार खटके उडाले. निवडणुकीत बघून घेण्याची भाषा झाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही गटांची ताकद स्पष्ट झाली. महाविकास आघाडीने ४८ पैकी ३० जागा मिळवत राज्यात दणदणीत विजय मिळवला. तर महायुतीला १७ जागांवरच विजय मिळवता आला. या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने २१ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी ९ जागा त्यांनी जिंकल्या. तर एकनाथ शिंदे यांना १५ जागा मिळाल्या होत्या त्यापैकी त्यांना ७ जागा जिंकण्यात यश आले.


निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा स्ट्राईक रेट हा ठाकरे गटापेक्षा अधिक होता. मात्र निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला मिळालेली एकूण मते ही शिंदे गटापेक्षा अधिक आहेत. मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने ४ जागा लढवल्या होत्या त्यापैकी तीन जागा त्यांनी जिंकल्या तर वायव्य मुंबईची जागा त्यांनी ४८ मतांनी गमावली. यातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मुंबईत वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले. लोकसभा पाठोपाठ उद्धव ठाकरे गटाने मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातही विजय मिळवला.


Read More
ShivSena Thackeray group is aggressive over Praniti Shindes decision
Praniti Shinde: सोलापुरात प्रकरण तापलं! प्रणिती शिंदेंच्या ‘त्या’ निर्णयाने शिवसेनेचा ठाकरे गट आक्रमक

Protest Against Praniti Shinde: काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्याने शिवसैनिक…

Maharashtra assembly election 2024 exit polls analysis by girish kuber
शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढलेलं मतदान, ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा; कोणते मुद्दे ठरणार निर्णायक?

शिवसेनेचे दोन गट तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट यांची मतं वाढल्यास राजकीय समीकरणं कशी बदलू शकतात यासंदर्भात लोकसत्ताचे संपादक…

Uddhav Thackeray holds a grand sabha in bandra east for Varun Sardesai live
Uddhav Thackeray Bandra East Live: वरुण सरदेसाईंसाठी उद्धव ठाकरेंची मातोश्रीच्या अंगणात सभा

Uddhav Thackeray Bandra East Live: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं वांद्रे पूर्वच्या जागेवरून वरूण सरदेसाई यांना उमेदवारी जाहीर केली. त्यांची थेट…

Uddhav Thackerays direct warning to the Mahayuti government
Uddhav Thackeray: ‘हम तुम्हे काटेंगे’ उद्धव ठाकरेंचा महायुतीला थेट इशारा, पंकजा मुंडेंचे मानले आभार

Uddhav Thackeray Speech: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज शेवटचा रविवार असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या प्रमुख नेत्यांच्या सभा ठिकठिकाणी आयोजित…

Uddhav Thackerays UNCUT speech in Eknath Shindes constituency
Uddhav Thackeray Kopari Pachpakhadi: एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचं भाषण UNCUT

Uddhav Thackeray Kopari Pachpakhadi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी १६ नोव्हेंबरला जाहीर सभा घेतली होती.…

Bandra East constituency public opinion on mla zishan siddique varun sardesai and trupati sawant Maharashtra assembly elections 2024
Bandra East Constituency: फोडाफोडीचं राजकराण अन् सहानुभूती; वांद्रे पूर्वमधील मतदारांचं म्हणणं काय? प्रीमियम स्टोरी

वांद्रे पूर्व या मतदारसंघाचे विद्यमान आमदार हे झिशान सिद्दीकी आहेत. ऐन निवडणुकीत त्यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात…

ताज्या बातम्या