
शिवेंद्रराजे भोसले हे भाजपाचे आमदार आहेत. अजिंक्यतारा सहकारी बँकेचे ते अध्यक्ष झाले आणि त्यांचा राजकीय प्रवास तेव्हाच सुरू झाला. अभयसिंहराजे भोसले यांच्या निधनानंतर राजकारणात शिवेंद्रराजे भोसले हे जास्त सक्रिय झाले. २००४ पासून सलग तीनवेळा शिवेंद्रराजे हे साताऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडली. त्यानंतर ते भाजपात आले.
शिवेंद्रराजे भोसले मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत. ते सातारा राजघराण्याचे वारसदार आहेत. ते अभयसिंह राजे भोसले यांचे पुत्र असून ते सातारा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे आमदारही होते. उदयनराजे भोसले हे त्यांचे चुलत भाऊ. अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा येथून तेएसएससी उत्तीर्ण झाले आहेत.