शिवजयंती २०२५ News

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्रासह भारतभर साजरी केली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार, फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (१९ फेब्रुवारी १६३०) रोजी शिवरायांचा जन्म झाला होता. महाराष्ट्रातील प्रत्येक शिवभक्तासाठी हा दिवस एखाद्या उत्सवाप्रमाणे असतो. गेल्या काही वर्षांमध्ये शिवजयंती मोठ्या जल्लोषामध्ये साजरी केली जात आहे. १८६९ मध्ये महात्मा फुले यांनी रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि त्यानंतर १८७० मध्ये पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली गेली. पुढे ब्रिटिशांविरोधात भारतीय जनमानसामध्ये एकी निर्माण व्हावी, यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवासह सार्वजनिक शिवजयंतीच्या प्रथेची सुरुवात केली. १८९५ मध्ये पहिल्यांदा शिवजयंतीचा उत्सव सार्वजनिकरीत्या साजरा केला गेला. राज्य सरकारने २००१ मध्ये १९ फेब्रुवारी १६३० ही शिवरायांची जन्मतारीख स्वीकारली. शिवरायांची जयंती तिथीनुसार साजरी करावी की तारखेनुसार या मुद्यावरुन महाराष्ट्रामध्ये वाद आहे. त्यामुळे तारखेला मान्यता देणारा गट १९ फेब्रुवारीच्या दिवशी शिवजयंती आहे असे मानतो. तर फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार शिवजयंती साजरी करणारा एक गट आहे.Read More
Chhatrapati Shivaji Maharaj aarti in badlapur at statue of chhatrapati shivaji maharaj
शेकडो बदलापूरकरांच्या उपस्थितीत शिवआरती; अश्वारूढ पुतळ्याला अभिवादनासाठी बदलापूरकरांची गर्दी

शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले.

Indapur former minister Harshvardhan patil
छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श युवकांनी घ्यावा – हर्षवर्धन पाटील

बावडा येथे शिवाजी एज्युकेशन संस्थेच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास शिवजयंतीनिमित्त हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी पुष्पहार अर्पण करून पूजा…

cm devendra fadnavis latest news
राज्यातील १२ किल्ल्यांची जागतिक वारसास्थळात नोंदीसाठी प्रयत्न, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेचे बुधवारी आयोजन करण्यात आले.

shiv jayanti celebrated with enthusiasm featuring processions statues and chariots depicting Maharajs life
नशिकमध्ये शिवजयंती मिरवणुकीत अपूर्व उत्साह

जिल्ह्यात अभूतपूर्व उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत पुतळ्यांसह महाराजांच्या जीवनावरील चित्ररथांचा समावेश होता.

Jalgaon jai shivaji jai bharat padyatra held on wednesday by nss and shiv jayanti committee
जळगावमध्ये शिवकालीन शस्त्रकलेची थरारक प्रात्यक्षिके, ‘जय शिवराय-जय भारत’ पदयात्रेत जल्लोष

राष्ट्रीय सेवा योजना आणि सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या विद्यमाने बुधवारी ‘जय शिवराय – जय भारत’ पदयात्रा काढण्यात आली.

shiv jayanti in dhul
धुळ्यात शिवजयंतीनिमित्त शोभायात्रेतून स्त्रीशक्तीचा जागर

समाजात महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर, इतिहासातील स्त्रीशक्तीचा जागर व्हावा, या हेतूने शिवजयंतीनिमित्ताने स्वराज्य सौदामिणी ताराराणी हा स्त्रीशक्तीला समर्पित सजीव…

shiv jayanti celebrated with great enthusiasm
जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात; पोवाडे, भगव्या पताकांनी वातावरण शिवमय

मध्यरात्री सांगलीतील शिवाजी महाराजाच्या पुतळ्याजवळ फटाययांच्या आताषबाजीमध्ये महिलांच्या पाळणा गीतांने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.

Marathi actress Neha Shitole Shared Special Post on Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025
“लायकी नसतानाही कपाळावर चंद्रकोर आणि…”, ‘शिवजयंती’निमित्ताने मराठी अभिनेत्रीची पोस्ट; म्हणाली, “आधुनिक मावळ्यांना…”

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025 : मराठी अभिनेत्रीने ‘शिवजयंती’निमित्ताने लिहिलेली ‘ही’ खास पोस्ट वाचा…

nanded shiv Jayanti 2025
नांदेडमध्ये ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रेचे आयोजन, संविधानाच्या प्रास्ताविकेचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले वाचन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये “जय शिवाजी जय भारत” पदयात्रेचे आयोजन करण्यात आले.

actor Vicky Kaushal on raigad
अभिनेता विकी कौशलने रायगडावर घेतले छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन

शिवजयंतीचे औचित्य साधून रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी येणार असल्याची घोषणा त्याने कालच केली होती.